खरिपात सोयाबीन बियाणे टंचाई यंदा नाही भासणार

दरवर्षी खरिपात सोयाबीन बियाणे टंचाई ही ठरलेलीच आहे. ऐन वेळी शेतकऱ्यांची धावपळ आणि बोगस बियाणे विक्रीतून होणारी फसवणूक यामुळे उत्पादनावरही परिणाम होतो. यंदा मात्र ही टंचाई भासणार नाही. यंदाच्या उन्हाळी हंगामात बिजोत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल हा वाढलेला आहे तर दुसरीकडे महाबीजनेही राज्यात तब्बल 12 हजार हेक्टरावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतला आहे.

महामंडळाला दीड ते दोन लाख क्विंटलपर्यंत कच्चे बियाणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय राज्यात यंदा शेतकऱ्यांनी 48 हजार हेक्टरावर पेरा केला आहे. त्यामधून बियाणाचा प्रश्न तर मिटेलच पण शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्नही पडणार आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान होत आहे. त्यामुळे बियाणांचा प्रश्न दरवर्षीच भेडसावत आहे. शिवाय यामुळे बियाणांचा दर्जाही ढासळतो. पण यंदा उन्हाळी हंगामाचा सक्षम पर्याय बियाणे कंपन्या आणि शेतकऱ्यांसमोर आहे.

यंदा उन्हाळी हंगामात विक्रमी सोयाबीनचा पेरा झाला आहे. यातच महाबीजने तब्बल 12 हजार हेक्टरावर बियाणांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे यंदा बियाणांची टंचाई तर निर्माण होणार नाही. सध्या बियाणांची काय अवस्था आहे याची पाहणी कृषितज्ञ करीत असून बियाणांची उगवण आणि वाढ ही उत्तम आहे.

यंदा मुबलक प्रमाणात पाणी आणि पोषक वातावरणामुळे उन्हाळी हंगामातील सोयाबीन हे बहरात आहे. खरिपातील सोयाबीन प्रमाणे या उन्हाळी सोयाबीनची वाढ होत आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीनला अधिकचा उतारा नसल्याचे सांगितले जाते पण यंदा हा तर्क मोडीत निघतो की काय अशी अवस्था आहे. महाबीजने विविध भागातील उत्पादनाची शक्यता पाहून बियाणाचा अंदाज घेतला आहे. त्यामुळे यंदा प्रमाणित आणि पायाभूत बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उन्हाळ्यात सोयाबीनचा पेरा केला आहे. राज्यात तब्बल 12 हजारावर उन्हाळी सोयाबीन घेण्याची ही पहिलीच वेळे आहे. त्यामुळे बियाणांचा तर प्रश्न मार्गी लागलाच आहे शिवाय शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळणार आहे. महाबीजनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. बियाणांबरोबर उन्हाळी हंगामातील सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्नही पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.