जिंकलं प्रेक्षकांच मन ,याला म्हणतात हाडाचा कलाकार
अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. शंतनूपेक्षा प्रिया मराठे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्रिया तिचे विविध फोटो तसेच कामाबद्दलची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रियानं नुकतीच नवरा शंतनूसाठी एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट वाचून सर्वांना नक्की शंतनूचा अभिमान वाटेल. सध्या प्रियाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
शंतनूच्या सफरचंद नाटकाचा प्रयोग नुकताच बोरिवलीमध्ये पार पडला. या प्रयोगाआधी एका महानाट्याच्या रिहर्सल दरम्यान शंतनूच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी हेयरलाईन फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. त्याच अवस्थेत शंतनूने महानाट्याचे प्रयोग केले. हे प्रयोग झाल्यावर शंतनू मुंबईत आला. कारण मुंबईत त्याच्या सफरचंद नाटकाचे प्रयोग होते. शंतनूच्या पायाला दुखापत झाली होती. अशावेळी प्रयोग रद्द झाला असता तर मोठं नुकसान झालं असतं. पायाला दुखापत झाली असताना शंतनूने नाटकाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
प्रयोग सुरु होण्यापूर्वी नाटकाचे निर्माते आणि सूत्रधार यांनी प्रेक्षकांना या गोष्टीची कल्पना दिली. शंतनू वॉकर घेऊन प्रयोग करेल असं प्रेक्षकांना सांगण्यात आलं होत. शंतनूने वॉकर घेऊन यशस्वीपणे प्रयोग केला. दिग्दर्शकांनी शंतनुच्या केवळ दोन मुव्हमेंट्समध्ये बदल केले आणि ठरलेला प्रयोग व्यवस्थित पार पडला.नाटक झाल्यावर जेव्हा कर्टन कॉलला सर्व कलाकारांची ओळख झाली तेव्हा शंतनूची स्टेजवर एंट्री होताच उपस्थित प्रेक्षकांनी उभं राहून शंतनूला दाद दिली आणि टाळ्यांचा कडकडाट केला.
याबद्दलच प्रियानं एक पोस्ट केली आहे. तिनं या पोस्टच्या माध्यमातून नवऱ्याचं कौतुक केलं आहे.प्रियानं तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, Real hero! Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.. हे तूच करू जाणे.. तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते..पाय fracture झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..कमाल! आता तुला हाडाचा कलाकार म्हणता येईल..सध्या प्रियाची ही पोस्ट वाचून सर्वांनी शंतनूचं कौतुक केलं आहे.
कलाकाराचं आयुष्य हे असचं असतं, अनेकदा आपलं दु: ख लपवून प्रयोगाला सामोरं जावं लागतं. कितीही संकट मोठ असलं तरी कोणी कुणासाठी थांबत नाही..म्हणून तर म्हणतात शो मस्ट गो ऑन..काहीही झालं तरी न थांबता आपलं काम करावं लागतं. अनेक कलाकार आपलं दु: ख विसरून आपलं मनोरंजन करताना दिसतात.