भाजप, शिंदे गटाचे ‘ते’ 3 नेते अडचणीत? राऊतांच्या नव्या ट्विटने खळबळ

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे, मात्र बेकायदेशीर कामे करणाऱ्याला मी सोडणार नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. आता यावरून राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?

मी आपलं एक वक्तव्य ऐकलं, व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणाला ‘मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!’ आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात ते महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत कारवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यासंह येऊन भेटू इच्छितो, गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राऊतांचा भाजप शिंदे गटाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांनी भाजपचे आमदार राहुल कुल, शिंदे गटाचे नेते मंत्री दादा भूसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, त्याबद्दल पुरावे देण्यासाठी मी आपली भेट घेऊ इच्छितो असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.