दोन दिवसात लाखोंची उलाढाल
जळगाव- येथील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव चॕप्टर च्यावतीने दोन दिवसीय एका छताखाली महिला उद्योजक व्यावसायिकांना प्राधान्य देत 60 स्टॉलचा समावेश असलेल्या कंझुमेक्स 2023 या विविधोपयोगी वस्तू व सेवा यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास सात ते आठ हजार नागरिकांनी भेट देत उस्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी महापौर जयश्री महाजन, रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील ,जळगाव जनता बँकेचे बापूसाहेब महाले, केदार पाठक, संकेत नेवे, अध्यक्ष अभिजीत पाटील, रिजन हेड श्रीहर्ष खाडीलकर ,वुमन विंग रिजन हेड डॉ.भावना चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन दिव्या पाटील यांनी केले.
सॅटर्डे क्लबच्या वुमन विंग असलेल्या उद्योगवारीने हे प्रदर्शनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. उद्योगवारीच्या डॉ. वृषाली छापेकर,आकांक्षा कुलकर्णी, रश्मी गोखले, नयना पाटील, पूर्वा वशिष्ठ, रूपाली ठाकूर, स्वाती राणे, डॉ.रेवती गर्गे यांनी नियोजन केले होते. सॅटर्डे क्लबच्या धुळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.
यशस्वीतेसाठी सॅटर्डे क्लबचे सचिव दिनेश थोरात ,कोषाध्यक्ष उमेश पाटील, अभिजीत वाठ, विनीत जोशी, सचिन दुनाखे, डॉ. दीपक पाटील, अॕड. निखिल कुलकर्णी, जयेश पाटील, राजेश यावलकर, तनुजा महाजन , उत्तरा बुनकर यांनी परिश्रम घेतले.