उंदरांचा इतका उच्छाद की सरकारही वैतागलं; बंदोबस्त करणाऱ्याला एक कोटी रुपयांची ऑफर
बऱ्याच लोकांच्या घरात उंदीर असतात. उंदरांना पळवण्यासाठी किती तरी उपाय केले जातात. पण काही वेळा या उंदरांना घराबाहेर काढणं म्हणजे आव्हान बनतं. काही केल्या उंदीर घराबाहेर जात नाहीत. याच उंदरांना पळवून लावण्यासाठी तुम्हाला कुणी पैसे दिले तर… उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला कोट्यवधी रुपये मिळतील असं सांगितलं तर… काय आश्चर्य वाटलं ना… तुमचा विश्वास बसत नाही आहे का… पण हे खरं आहे.
जगातील महासत्ता म्हणून ओळखलं जाणारं अमेरिकेतील हे प्रकरण आहे. इथलं न्यूयॉर्क शहर उंदरांना वैतागलं आहे. 2014 साली न्यूयॉर्क शहरात प्रत्येक व्यक्तीकडे अंदाजे दोन उंदीर होते. याचा अर्थ इथं आता उंदरांचा आकडा जवळपास एक कोटी 80 लाख आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 2022 च्या सुरुवातीच्या आठ महिन्यांत उंदरांबाबत 70% तक्रारी आल्या. त्यावर कारवाई करण्यात आली आहे. उंदरांची दहशत रोखण्यासाठी नवा कायदाही आणला जाणार आहे.
दरम्यान उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी न्यूयॉर्क सरकार तज्ज्ञांच्या शोधात आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार यासाठी वर्तमानपत्रात याची अधिकृत जाहिरातही देण्यात आली आहे. उंदरांना पळवण्यासाठी त्या तज्ज्ञाला 170,000 डॉलर म्हणजे जवळपास एक कोटी 13 लाख रुपयांचं पॅकेजही जारी केलं आहे. या तज्ज्ञाच्या पात्रतेचे निकषही या जाहिरातीत देण्यात आले आहेत. यामध्ये पदवी, शत्रूशी लढण्याची जिद्द, प्रवृत्तीचा असायला हवा असंही या जाहिरातीत नमूद कऱण्यात आलं आहे.
पुण्यात आढळला धोकादायक झिका विषाणूचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट
कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर एका गंभीर आजाराने पुणे शहरात शिरकाव केला आहे. पुण्यात झिका विषाणूचा रुग्ण आढळला आढळला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूळचा नाशिक येथील हा रुग्ण पुण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात तो सुरतला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. झिकाचा रुग्ण आढळल्याने पुणे महापालिकेची महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
छत्तीसगढमध्ये मातीच्या खाणीत मोठी दुर्घटना; ७ कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
छत्तीसगढच्या बस्तर जिल्ह्यात शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. जगदलपूर शहरात मालगांवमध्ये मातीची खाण कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक कामगार अद्याप खाणीत अडकले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पाच लोकांचा मृत्यू खाणीतच झाला होता तर दोघांचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
सोलापूरातील भीम भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी असतो. या दिनानिमित्त बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी राज्य आणि देशभरातून अनेक भाविक मुंबईत येत असतात. यासाठी भाविकांचे कोणतेही हाल होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे कडून 14 विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. या सर्व 14 रेल्वे गाड्या देशभरातील 16 विभागाकडून 5 डिसेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत. यामध्ये सोलापूरमधून 2 गाड्या असतील अशी माहिती सोलापूर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली आहे.
मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका; चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्याआधी CM बोम्मईचं मोठं वक्तव्य
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार आहेत. मात्र, त्याआधीच कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं असून महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका, असा संदेश दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
मेजर पती शहीद; पतीचं अपुरं राहिलेलं स्वप्न वीरपत्नी करतेय पूर्ण
भारतीय सैन्यदलातील अनेक वीर जवानांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या 7व्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक हेसुद्धा कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. यानंतर त्यांच्या पत्नी गौरी महाडिक यांनी आपले पती शहीद झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता.
वीरपत्नी गौरी महाडिक यांनी सैन्यात भरती होऊन शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला होता. यानंतर त्या 2020 मध्ये भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या होत्या. आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून आता त्या भारतीय सैन्यदलात पायलट झाल्या आहेत.
खासदार गोडसेंचं करिअर संपले, निवडून येऊन दाखवावं; राऊतांचे थेट आव्हान
शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा हा दौरा महत्त्वाचा असून या दौऱ्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट आव्हान दिलं आहे. हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावं असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे ४० आमदार गेले, १३ खासदार गेले तरी शिवसेने अजूनही तशीच आहे. मी लोकांमध्ये जातोय, तेव्हा शिवसेनेबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना असल्याचं दिसतंय. नाशिकमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी भेटतायत. सर्वसामान्य जनता भेटते. सगळे आपआपल्या जागेवर आहेत. चिंता करण्याची गरज नाहीय. थोडा पालापाचोळा उडाला आहे पण शिवसेना आणि शिवसैनिक आपआपल्या जागी आहेत असंही संजय राऊत म्हणाले.
इस्रो हेरगिरी प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द!
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना विनाकारण गुंतवलेल्या इस्रो हेरगिरी प्रकरणातील पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यात केरळच्या माजी पोलीस महासंचालकांचाही समावेश आहे. केरळ उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच पाचही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
१४ वर्षांनंतर सौराष्ट्र बनला चॅम्पियन! महाराष्ट्रावर पाच गडी राखून मात, ऋतुराजचे शतक ठरले व्यर्थ
अहमदाबाद येथे महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना झाला. सौराष्ट्रचा संघ १४ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन बनला आहे. २००७-०८ च्या मोसमात शेवटच्या वेळी संघ चॅम्पियन बनला होता. सौराष्ट्राच्या शेल्डन जॅक्सनच्या खेळीने महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यावर छाया पडली. सौराष्ट्राने हा सामना पाच गडी राखून जिंकला.
सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने ५० षटकांत नऊ गडी गमावून २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रने ४६.३ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. हार्विक देसाई ५० आणि समर्थ व्यास १२ धावा करून बाद झाला. जय गोहिल खाते उघडू शकला नाही.
SD Social Media
9850 60 3590