सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी चर्चेत असलेले विकास मालू आहेत तरी कोण?

सतीश कौशिक यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. बॉ़लिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून तर त्यांची वेगळी ओळख आहेच , शिवाय त्यांना एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या निधनानंतर आता सतत एक नाव चर्चेत आलं आहे ते म्हणजे विकास मालू. हे विकास मालू कोण आहेत व ते काय करतात त्यांचा सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी काय संबंध आहे, असा सर्वांना प्रश्न पडला आहे. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहे.

दूसऱ्या बायकोनं केलं गंभीर आरोप

विकास मालू यांचे नाव सर्वांनी पहिल्यांदाच ऐकलं आहे. कारण सतीश यांच्य मृत्यूनंतर विकास मालू यांच्या दुसऱ्या पत्नीनं सान्वीने शंका उपस्थित केली आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिनं म्हटलं आहे की, विकासने सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. करोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे 15 कोटी परत करण्याचा त्यांचा कोणताच उद्देश नव्हता, असा दावा सान्वीने केला आहे. त्यामुळेच विकासनं सतीश यांना आपल्या रस्त्यातून कायमचं बाजूला करण्याचा प्लॅन केला होता. आता याप्रकरणी दिल्ली पोलीस जागी झाली आहे. असं जरं असलं तरी विकास मालू यांचं मत आहे की, माझ सतीश कौशिक यांच्यासोबत 30 वर्षापासून संबंध आहेत. त्यांच्या मृत्यूच्या धक्यातून मी अद्याप सावरलेलो नाही. माझ्यावर असे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांचे मत आहे..

विकास मालू यांच नाव सध्या चर्चेत आहे मात्र उद्योग विश्वातील विकास मालू मोठं नाव आहे. देशात आणि जगभरात त्यांचा मोठा व्यवसाय आहे. कुबेर ग्रुपचे ते मालक आहेत. कुबेर ग्रुपनं खैनीपासून त्यांच्या व्यवसायाची सुरूवात केली होती. आता हा ग्रुप 45 विविध व्यवसायासोबत जोडला गेला आहे. या ग्रुपचे कार्य़क्षेत्र 50 देशात पसरलं आहे.

लग्जरी कारची आहे आवड

एक चांगला उद्योगपती अशी विकास मालू यांची ओळख आहे. अॕक्वा मिनरल्स प्राइवेट लिमिटेड (KUBER AQUA MINERALS PRIVATE LIMITED)चं डायरेक्टर करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांची वर्धमान इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेड (VARDHMAN INTERNATIONAL PRIVATE LIMITED) कंपनीचे मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे. विकास मालू यांच्याकडं कोटीची संपत्ती आहे. मालू फर्महाउस, कुबेर कॉटेज, कुबेर पैलेस, कुबेर कुंज यासारखी लग्जरी प्रॉपर्टी त्यांच्याकडं आहे. तसेच त्यांच्याकडे लग्जरी कार देखील आहेत. याशिवाय त्यांचं बॉलिवूड जगताशी देखील चांगले संबंध आहेत.

वाद आणि विकास मालू कनेक्शन

वाद आणि विकास यांचे जूनं कनेक्शन आहे. 2021 मध्ये टॅक्स वाचवण्यासाठी भारत सरकारसोबत कायदेशीर लढा सुरू केला. यासाठी त्यांनी देशातील टॉपच्या वकिलांची नेमणूक केली. त्यांच्यावर बलात्कार, कौटुंबिक हिंसा याशी संबंधीत गुन्हे देखील नोंद आहेत.

पर्सनल सेक्रटरीसोबत केलं लग्न

पहिल्या पत्नीपासून वेगळं झाल्यानंतर विकास मालू यांनी त्यांची पर्सनल सचिव सान्वी हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांच्यावर पत्नीनचं रेप केल्याचा आरोप लावला आहे. तसेच त्यांच्यावर कौटुंबिक हिंसा केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे. ते जास्तीत जास्त दुबईतच राहतात. बायकोनं आरोप केल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मृत्यूच्या आधी सतीश कौशीक विकास मालू यांच्या फार्महाउसवर देण्यात आलेल्या होळी पार्टीत सहभागी झाले होते. विकास मालू यांच्यासोबत त्यांनी खूप डान्स केला होता. तसेच जेवण देखील केलं होतं. यानंतर मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली. रुग्णालयात पोहचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.