ऑस्करच्या दिमाखदार सोहळ्यात जपली भारतीय संस्कृती
आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’या गाण्याने यंदाचा बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीत ऑस्कर जिंकला आहे.नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे.सोहळयात दीपिका पदुकोणने पुरस्कार सादर करत भारताचं प्रतिनिधित्व केलं.ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात यावेळी RRR च्या चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. रामचरण, ज्युनिअर एनटीआर आणि एस एस राजामौली देखील उपस्थित होते.
श्रीलंकेचा पराभव भारताच्या पचनी! भारताने गाठली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात पराभव केला. या पराभवामुळे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपची फायनल गाठली आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा फायनल सामना 7 जून रोजी होणार आहे.
क्रांती रेडकरच्या पतीवर बनणार सिनेमा; अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य झळकणार मोठ्या पडद्यावर
दोन वर्षांपूर्वी एका रात्री बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा लेक आर्यनला मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली. या बातमीनं बॉलिवूड जगतात खळबळ माजली. पण या प्रकरणात आर्यनला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा झाली. त्यांचं नाव होतं समीर वानखेडे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकरचे हे पती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप चर्चा झाली. या प्रकरणात क्रांती रेडकरने आपल्या नवऱ्याला खंबीर साथ दिली. आता हे सगळं प्रकरण मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.’अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आता बायोपिक बनणार आहे. वर्षअखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक ‘मैं अटल हूं’च्या निर्मात्यांपैकी एक असलेला झीशान अहमद मुंबईत NCB अधिकारी म्हणून तैनात असलेल्या समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये टीव्ही पत्रकार निधी राजदानचाही समावेश असून समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संवादावर या चित्रपटाचं कथानक आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD चं बंधन नाही; UGC चा मोठा निर्णय
केंद्रीय विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर्सच्या पदांवर भरतीसाठी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पीएचडी बंधनकारक नाही, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी दिली. उस्मानिया कॅम्पसमध्ये नव्याने बांधलेल्या UGC-HRDC इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आयोगाच्या NET परीक्षेमधील व्यक्तीची पात्रता असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पुरेशी असेल, असंही त्यांनी म्हटलंय. या संदर्भात ‘तेलंगणा टुडे’ने वृत्त दिलंय.
पीएचडी नसलेल्यांना भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्त करता यावं या साठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, विद्यापीठांमध्ये शिकवू इच्छिणाऱ्या परंतु पीएचडी पदवी नसल्यामुळे ते करू न शकणाऱ्यांना संधी देणं, हेही या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.
विदर्भात यंदा सूर्य भाजून काढणार
जागतिक स्तरावर आणी विशेषतः भारतात 2010 पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच ‘ला निना’ नंतर वाढत चाललेला ‘अल निनो’चा प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे वर्ष ठरेल असा अंदाज पर्यावरण आणि हवामान अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हवामान बदल आणि तापमान वाढ ही गंभीर समस्या मानव आणि सजीव सृष्टीपुढे उभी ठाकली आहे. तर या आठवड्यात विदर्भ आणि नागपुरातील तापमानात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा धोका! आरोग्य यंत्रणांना अलर्ट
कोरोना महामारीनंतर आता H3N2 व्हायरसनेही दहशत वाढवली आहे. व्हायरल तापाने देशाला जणू ग्रासले आहे. H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे देशात मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यापासून देशात एडेनोव्हायरसचे रुग्णही नोंदवले जात आहेत. दरम्यान अनेक राज्यांमध्ये कोविड-19 संसर्गामध्येही वाढ दिसून आली आहे, अशा परिस्थितीत आता केंद्राने सर्वच राज्यांना अलर्ट दिला आहे. H3 N2 वायरस संदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडली. यात राज्यातील वैद्यकीय यंत्रणांना सावध राहण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट! या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा
मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भात 15 मार्च ते 18 मार्च या काळात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.
शेतकऱ्यांनी शेतीची कामं लवकर आटोपती घेत पिकांची काळजी घेण्याचं आवाहन नागपूर वेधशाळेने केलं आहे. तसंच 17 मार्चनंतरदेखील गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश पालिका निवडणुका : घरपट्टी अर्ध्यावर तर पाणीपट्टी माफ करण्याचे ‘आप’चे आश्वासन
ज्या ज्या महापालिकांमध्ये महापौर आणि अध्यक्षपदावर ‘आप’चे उमेदवार विजयी होतील, त्या त्या ठिकाणी घरपट्टी अर्ध्यावर आणली जाईल तर पाणीपट्टी पूर्णपणे माफ केली जाईल, असे आश्वासन आम आदमी पार्टीचे उत्तर प्रदेशसाठीचे राज्य प्रमुख आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी रविवारी लखनौ येथे एका पत्रकार परिषदेत दिले. याप्रसंगी ते म्हणाले की, महापालिकांतील एकूण ७६३ पैकी ६३३ ठिकाणी पक्षातर्फे प्रमुख नेत्यांची नियुक्तीही लवकरच करण्यात येईल.
घरच्या मैदानावर टीम इंडियाच शेर! चौथी कसोटी अनिर्णित; २-१ ने बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर कोरले नाव
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामना अनिर्णीत राहिला आणि त्याचबरोबर टीम इंडियाने २-१ अशी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खिशात घातली. मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता. सोमवारी (१३ मार्च) दोन्ही संघांतील हा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. हा सामना जरी अनिर्णीत राहिला तरी देखील भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थान निश्चित केले.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या आणि जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. यानंतर भारतीय संघानेही जवळपास दोन दिवस फलंदाजी करत ५७१ धावा केल्या. त्यानंतरच हा सामना अनिर्णित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून १७५ धावा केल्या. यानंतर कर्णधार आणि सामनाधिकारी दोघांनीही सामना बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत हा सामना नियोजित वेळेच्या जवळपास दीड तास आधी संपला.
SD Social Media
9850 60 3590