आज दि.८ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

संजय राऊत नरमले, हक्कभंग नोटीशीबाबत विधिमंडळाला पत्र, मुदतवाढ की शिक्षा आजच निर्णय!

 ‘विधीमंडळ नव्हे चोर मंडळ’ असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे संजय राऊत चांगलेच अडचणीमध्ये आले आहेत. विधीमंडळाकडून संजय राऊत यांना या वक्तव्याप्रकरणी हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र अद्यापही संजय राऊत यांनी या नोटीसीला उत्तर दिलेलं नाही. आता संजय राऊत यांनी विधीमंडळाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये हक्कभंग नोटीसीवर स्पष्टीकरण देण्यासाठी अधिकच्या वेळीची मागणी करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या विधीमंडळ कार्यालयाकडून राऊतांच्या पत्रावर विचारविनिमय सुरू आहे. थोड्याचवेळात विधीमंडळ कार्यालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे राऊतांना मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा सुनावली जाणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

भाजपला गरज नसतानाही राष्ट्रवादीचं ‘हम साथ साथ है’, नागालँडमध्ये विरोधक नसलेलं सरकार!

नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजपसोबत एनडीपीपी सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे आणि सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. नागालँडमध्ये यावेळी पहिल्यांदाच विरोधक नसलेलं सरकार बनणार आहे. निवडणुकीनंतर तिसरा सगळ्यात मोठा पक्ष असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूसह सगळ्याच राजकीय पक्षांनी कोणत्याही अटीशिवाय भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये एवढ्या पक्षांना विजय मिळाला आहे. तसंच इतिहासात पहिल्यांदाच नागालँडची विधानसभा विरोधी पक्षाशिवाय अस्तित्वात येईल.

नागालँडमध्ये विजय मिळवलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी एनडीपीपी-भाजप युती सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 2 मार्चला जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर यश मिळालं. 60 आमदारांची संख्या असलेल्या नागालँड विधानसभेत एनडीपीपी-भाजप युतीला 37 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं.

पुण्याचा सुहास घोडके बनला सिद्धेश्वर केसरी, पाहा कसा रंगला थरार

कुस्ती हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ असून तो गावागावात खेळला जातो.विविध ठिकाणच्या यात्रा, जत्रा, उत्सवांमध्ये कुस्तीची जंगी मैदाने होत असतात. कुस्ती शौकिन अशा मैदानांना हजेरी लावत असतात.श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानने सालाबादप्रमाणे जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले होते. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून मल्ल सहभागी झाले होते.या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या सिद्धेश्वर केसरीचा बहुमान पुण्याचा पैलवान सुहास घोडके याने पटकावला. देवस्थानच्या वतीने चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दिले जाणारे 51 तोळे चांदीचे कडे देवंग्रा येथील पैलवान गणेश काळे याला मिळाले.

भारतातील हा रेल्वेमार्ग अजूनही इंग्रजांच्याच ताब्यात, वर्षाला दिला जातो कोट्यवधींचा महसूल

जर कोणी तुम्हाला सांगितले की आज भारतात एक रेल्वे मार्ग आहे तो अजूनही इंग्रजांच्या ताब्यात आहे, तर तुमचा विश्वास बसेल का?  पण ते खरे आहे. शंकुतला रेल्वे मार्ग हा भारतातील एकमेव खाजगी रेल्वे ट्रॅक आहे. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्रात आहे. त्याची मालकी ब्रिटनच्या एका खासगी कंपनीकडे आहे. हे ब्रिटीशांच्या काळातच बांधले गेले आहे. 190 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर नॅरोगेज रेल्वे धावत असते. यवतमाळची ही लाईन मूर्तिजापूर पर्यंत जातो.

ब्रिटीश काळात, या ट्रॅकवरील गाड्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेद्वारे चालवल्या जात होत्या. स्वातंत्र्यानंतर सुमारे 70 वर्षांनी रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झाले. मात्र या मार्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशा प्रकारे, हा ट्रॅक अजूनही सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी या ब्रिटनच्या खाजगी कंपनीच्या अंतर्गत आहे. आता त्यावर फक्त एकच ट्रेन चालते, तिचे नाव शंकुतला पॅसेंजर आहे या ट्रेनच्या नावावरून ट्रॅकचे नावही प्रसिद्ध झाले आहे.भारतीय रेल्वे या ट्रॅकचा वापर करते, त्यामुळे दरवर्षी सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनीला करोडो रुपयांची रॉयल्टी भरली जाते. मात्र, पैसे घेऊनही ब्रिटिश कंपनी या ट्रॅकची दुरुस्ती किंवा देखभाल करत नाही. भारत सरकार कंपनीला दरवर्षी सुमारे 1.20 कोटी रुपयांची रॉयल्टी देते. अनेकवेळा ही लाईन विकत घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. कनिष्ठ वर्गातील कुटुंबांसाठी यवतमाळ ते अचलपूर (अमरावती जिल्ह्यातील) प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे शकुंतला पॅसेंजर. त्यामुळे या रेल्वेची सेवाही थांबवता येत नाही.

भारत चौथा कसोटी सामनाही जिंकणार?

भारताला सलग दुसऱ्यांदा विश्व टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल, तर भारतीय खेळाडूंना काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. गुरुवारी ९ मार्चला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाचे खेळाडू नेट्समध्ये कंबर कसत आहेत. भारताने या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. पण डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रेवश करण्यासाठी चौथ्या सामन्यात भारताला विजय संपादन करावं लागणार आहे. यासाठी भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. रोहितच्या पलटणला ३-१ च्या फरकानं मालिकेवर कब्जा मिळवावा लागेल, जेणेकरुन श्रीलंके आणि न्यूझीलंड दौऱ्यावर डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना अवलंबून राहू नये.

भाजपाची २०२४ लोकसभा निवडणुकीची ‘ब्लू प्रिंट’ तयार; मोदींच्या १०० सभा

भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ साठीची ब्लूप्रिंट तयार असून ज्या राज्यांमध्ये भाजपाला आपली व्याप्ती वाढवायची आहे, अशा राज्यांत या वर्षाच्या अखेरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास १०० मोठ्या सभा होणार आहेत. तसेच यामाध्यमातून महिला आणि अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहोचण्याचा पर्यत्न केला जाईल. दक्षिणेतील राज्य, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १६० मतदारसंघांकडे विशेष लक्ष देऊन त्याठिकाणी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे.

BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस

बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र आता बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सर्व्हिस लॉन्च करणार आहे.भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच भारतात 4G सर्व्हिस लॉन्च करणार आहे. बीएसएनएलने पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये कमर्शिअल ४ जी सेवा सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून काही उपकरणे खरेदी करत आहे. मागील महिन्यामध्ये कंपनीने TCS कन्सोर्टियमकडून उपकरणांसाठी तब्बल २४,५०० कोटींचा कर्ररला मंजुरी दिली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.