काठीच्या राजवाडी होळीत रंगले आदिवासी बांधव! 5 दिवस चालणार मोठा उत्सव

आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी  मोठ्या थाटात संपन्न झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता आगामी पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल.

आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरु केल्याच म्हटलं जातं. 1246 पासून सुरु झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि सामानातेतील वैविध्याचे रंग आणि पाम्पारिक स्वरूप कायम ठेवून आहे. सातपुड्यातील डोंगर रागांमधील काठीची राजवाडी होळीचा मोठ्या उत्साहात असतो. आदिवासी बांधव ही होळी पारंपारिक पद्धतीनं साजरी करतात.

ढोल, बासरी,  शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधव पाहटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेले.

होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब – श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या “काठी” संस्थांची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूम धडाक्यात साजरी होते.

संपूर्ण रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे. काठीची ही राजवाडी होळी हे या एकतेचं मुख्य कारण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.