आजोबा हा आपल्या नातवाचा पहिला मित्र असं म्हटलं जातं आणि जर ते राज्याचे मुख्यमंत्री असतील तर मग गोष्टच वेगळी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नातवासह ठाण्यात होळीला पोहोचले होते. यावेळी चक्क एका दुकानात जाऊन त्यांनी नातवाला चेंडू घेऊन दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या किसननगरमध्ये लहानाचे मोठे झाले तिथे होळीच्या निमित्ताने गेले होते. यावेळेस त्यांच्या सोबत त्यांचा नातू रुंद्राश देखिल होता. होळी दहन झाल्यानंतर रुंद्राशने आजोबांकडे दुकानातून काही तरी घेऊन द्या असा हट्ट धरला.
त्याने हट्ट करताच मुख्यमंत्री असलेल्या आजोबांनी लगेच त्याला दुकानात घेऊन गेले. आता आपल्या दुकानात राज्याचे मुख्यमंत्री आल्याचे पाहून दुकानदारही भारावून गेला. मुख्यमंत्री शिंद यांनी मग आपल्या नातवाला चेंडू घेवून दिला. तितक्यात तिथे श्रीकांत शिंदेही पोहोचले. त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून दुकानदाराला दिले.