बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया करणार लवकरच दुसर्‍या बाळाचे स्वागत

बॉलिवूड आभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता-मॉडेल अंगद बेदी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा गर्भवती आहे. अंगद आणि नेहा लवकरच आपल्या दुसर्‍या बाळाचे स्वागत करणार आहेत. अलीकडेच नेहा धुपियाने ही चांगली बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तिच्या बेबी बंपसह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना नेहाने लिहिले, ‘हे कॅप्शन ठरवण्यात 2 दिवस लागले… आणि मला वाटतं सुचलेलं सगळ्यात उत्तम म्हणजे देवा तुझे खूप आभार…’

या फोटोमध्ये नेहा सोबतच तिचा नवरा अंगद बेदी आणि मुलगी मेहरही दिसत आहेत. तिघांनीही ब्लॅक कलरचे मॅचिंग कपडे घातले आहेत. नेहा धुपिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा फॅमिली फोटो खूपच सुंदर दिसत आहे.

हे वृत्त स्वतः नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी शेअर केले आहे. यानंतर अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, रोहित रेड्डी, सानिया मिर्झा, दिलजीत दोसांझ, संदीपा धार यांच्यासह अनेक सेलेब्रेटी या दोघांना शुभेच्छा देत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने 3 वर्षांपूर्वी अभिनेता अंगद बेदीशी लग्न केले. नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीसोबत 10 मे 2018 रोजी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये अतिशय खासगी सोहळ्यात लग्न केले होते. 18 नोव्हेंबर 2018 रोजी 6 महिन्यांनंतर त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला होता.

रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री नेहा धूपिया लवकरच एका वेब शोमध्ये कॉपच्या भूमिकेत दिसणार असून, या सीरीजमध्ये अभिनेत्री यामी गौतम देखील दिसणार आहे. याशिवाय ती विद्युत जामवाल आणि रुक्मिणी मैत्रांसोबत ‘सनक’ या अ‍ॅक्शन फिल्ममध्येही दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.