पेगासस सॉफ्टवेअरच्या अहवालात
तथ्य नाही : अश्विनी वैष्णव
पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप केले जात असून त्यांची हेरगिरी केली जात आहे, असा दावा करत विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. मात्र केंद्र सरकारने विरोधकांचा हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज संसदेत सरकारची भूमिका मांडली. डेटामध्ये फोन नंबर्स असल्याने त्यामुळे हॅक झाल्याचं स्पष्ट होत नाही, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
स्वत: गाडी चालवत
मुख्यमंत्री निघाले पंढरपूरला
मंगळवारी (२० जुलै २०२१ रोजी) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी दोनच्या सुमारास मातोश्री या त्यांच्या निवासस्थानवरुन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला. मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नियमात
सूट का? न्यायालयाचा प्रश्न
केरळच मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी करोनासंदर्भातील नवीन नियमांची घोषणा केलीय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली असून कोर्टानं केरळ सरकारकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सध्या या निर्णयावर कोणतंही मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं नाही.
सीबीएसई बोर्डाचा निकाल
२० जुलै रोजी घोषित होण्याची शक्यता
दहावीचा एसएससी बोर्डाला निकाल घोषित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सीबीएसई बोर्डाच्या निकालाकडे आहे. हा निकाल निकाल २० जुलै रोजी घोषित होण्याची शक्यता आहे. अद्यापर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) ने याबाबत अधिकृत घोषणा केलली नाही. पण, विद्यार्थ्यांना याबाबत लक्ष ठेवण्याचे सांगितले जात आहे. हा निकाल घोषीत झाल्यानंतर तो cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in या वेबसाईटवर बघता येणार आहे.
ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या वासंती सोर
यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन
नाशिक येथील ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या वासंती सोर यांचे, राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांना गांधी-विनोबांचा त्यांना सहवास लाभला होता. त्या ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित होत्या. विनोबांच्या वर्धा येथील ‘महिलाश्रमा’त त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण झाले. विनोबांच्या भूदान यात्रेतही त्या वर्धा व गया (बिहार) येथे सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले तुषार आणि तरंग, सुना गीता आणि नात असा परिवार आहे.
पुढील चार ते पाच दिवस
जोरदार पावसाची शक्यता
१९ ते २३ जुलै रोजी हवामानविभागाने महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध
व्हावा यादृष्टीने २०० कोटी रुपयांची तरतूद
आदिवासी बांधवांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने शेळी व कुक्कुटपालनासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॕड. के. सी. पाडवी यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारतर्फे राजपूत लॉन्स येथे आयोजित खावटी अनुदान योजनेअंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.
दोन दिवसांपासून पेट्रोल
आणि डिझेलचे दर स्थिर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. देशातील बहुतांश शहरात पेट्रोलची किंमत ही 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा दर हा स्थिर आहे. रविवारसह आज सोमवारी (19 जुलै) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशांतर्गत तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत.
पाकिस्तानच्या बॉलरला मारलेला
षटकार गेला स्टेडियमच्या बाहेर
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना काल १८ जुलै रोजी लीड्सच्या हेडिंग्ले येथे खेळला गेला. या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. लिव्हिंगस्टोनने २३ चेंडूत ३८ धावा केल्या आणि तीन शानदार षटकारही ठोकले. यापैकी त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफला मारलेला षटका आरपार गेला. हा चेंडू स्टेडियमच्याही बाहेर गेला. इंग्लंड क्रिकेटने लिव्हिंगस्टोनने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. लिव्हिंगस्टोनच्या या षटकाराची मोठी चर्चा होत आहे, काही लोक टी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा षटकार असल्याचेही म्हणत आहेत.
सोन्याचे दर 60 हजार रूपयांचा
आकडा पार करू शकतात
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. आपण सोन्याच्या दरांधील चढ-उतार पाहिला तर गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 410 रूपयांनी वाढले आहेत. चांदीच्या दरांत देखील 123 रूपयांनी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन एन्ड ज्वैलर्स एसोसिएशनच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यात म्हणजे 9 जुलै रोजी सोन्याचे दर 47 हजार 863 रूपये प्रति ग्रॉम होते. 16 जुलैपर्यंत सोन्याचे दर 48 हजार 273 रूपयांवर पोहोचले. सोन्याच्या दरात 410 रूपयांनी वाढ झाली.
तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे
मासे, चौघांविरोधात तक्रार
कोरोना काळात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काही ठिकाणी वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी चैन स्नॅचिंग आणि घरफोडी सारख्या गंभीर चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी इंदापूरच्या शेतकऱ्याच्या शेततळ्यातून तब्बल पाच लाखांचे मासे चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेपाळ काँग्रेसचे प्रमुख
शेर बहादुर देउबा झाले पंतप्रधान
नेपाळ काँग्रेसचे प्रमुख शेर बहादुर देउबा आता अधिकृतपणे नेपाळचे नवे पंतप्रधान झाले आहेत. रविवारी झालेल्या बैठकीत विश्वास ठरावात त्यांना 165 मतं मिळवत विश्वासमत जिंकलं. देउबा यांना 12 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 13 जुलै रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले. कोर्टाने 21 मे रोजी राष्ट्रपतींनी विसर्जित केलेली संसद पुनःस्थापित केलीय.
SD social media
9850 60 3590