जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतरचे काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाल्यांना पुर आले. तर काही धरणेही भरली. तसेच राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.
हवामान खात्याने काय म्हटलं –
राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या ३ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.