होळीच्या तोंडावर मोठी कारवाई, गुजरातमध्ये तब्बल 425 कोटींचं ड्रग्स जप्त

देशभरात होळीची धूम सुरू असताना गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर मोठी घटना घडली आहे. समुद्राजवळ एक इराणहून आलेली बोट पकडली आहे. या बोटीमध्ये तब्बल 425 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ऐन होळीच्या तोंड्यावर एटीएस आणि कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखाच्या समुद्रकिनाऱ्यावर एटीएस आणि कोस्टगार्डने संयुक्त कारवाई केली. इराणहून आलेली एक संशयास्पद बोट पकडली. या बोटीची तपासणी केली असता 425 कोटी किंमतीचे 61 किलो हेरॉइन आढळून आले. या बोटीवर असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक गुप्त खबऱ्याकडून शहरात मोठ्या प्रमाणात हेरॉइन येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.ओखा समुद्रकिनाऱ्यापासून तब्बल 340 किलोमिटर दूर अंतरावर एक संशयित बोट आढळून आली. गस्तीवर असलेल्या कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी बोटीला थांबण्याची सूचना केली. पण, तिथून पळ काढण्याचा बोटीने प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करून या बोटीला पकडण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.