टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक, आयर्लंडवर 5 धावांनी विजय

महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताने धडक मारली. आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. मात्र गुणांच्या जोरावर भारताने सेमीफायनलमध्ये स्थान पक्कं केलं. भारताने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद  १५५ धावा केल्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडला पहिल्याच चेंडुवर धक्का बसला. रेणुका ठाकुरने टाकलेल्या चेंडुवर दोन धावा घेण्याच्या नादात एमी हंटर धावबाद झाली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर ओरला प्रेंडरगास्टचा त्रिफळा रेणुका ठाकुरने उडवला.

भारत आणि आयर्लंड यांच्यातला सामना ८.२ षटकानंतर पावसामुळे थांबवण्यात आला. अखेर पाऊस न थांबल्यानं सामना रद्द करण्यात आला, तर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा या सामन्यात ५ धावांनी विजय झाला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्यानंतर आता भारत तिसरा संघ ठरला जो सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. तर भारताच्या एन्ट्रीमुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

तत्पूर्वी, शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने ९.३ षटकात ६२ धावांची भागिदारी करत चांगली सुरुवात करून दिली. शफाली २४ धावा काढून बाद झाली. त्यानतंर स्मृतीने हरमनप्रीतसोबत अर्धशतकी भागिदारी केली. हरमनप्रीत उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाली. त्यानंतर रिचा घोष खातेही उघडू शकली नाही.

स्मृती मानधनाने ५६ चेंडूत ८७ धावा केल्या. यात तिने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. स्मृतीची तिच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीतली सर्वाधिक धावसंख्या ठरली. तर जेमिमाह रॉड्रिग्जने १९ धावा केल्या. स्मृतीनंतर आलेली दिप्ती शर्माही शून्यावर बाद झाली. तिच्यानंतर आलेल्या पूजा वस्त्राकर २ धावांवर नाबाद राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.