लोकसभेत गोंधळ घातल्याच्या कारणास्तव लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या खासदारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. अध्यक्षांनी काँग्रेसच्या 4 खासदारांवर कारवाई केली असून त्यांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये मन्नीकम टागोर, ज्योति मनी, टीएन प्रतापन आणि राम्या हरिदास यांचा समावेश आहे.
खासदार अध्यक्षांनी मनाई केल्यानंतरही प्लेकार्ड दाखवित विरोध करीत होते. यानंतर लोकसभेचे कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. सभागृहात गदारोळ आणि घोषणा फलक झळकवल्या बद्दल त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
सर्व काँग्रेस सदस्यांवर 374 नियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या नियमांमध्ये जाणूनबुजून संसदेच्या कारवाईत अडथळा आणल्याच्या कारणांचा उल्लेख आहे. या सर्व खासदारांविरोधात आधी निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला होता. यानंतर सर्वांच्या सहमतीने त्यांचं निलंबन करण्यात आलं.