बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यानंतर या वेब सीरीजचा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी जानेवारी महिन्यात चाहत्यांची प्रतीक्षा काहीशी कमी झाली होती आणि त्याचा टीझर देखील प्रदर्शित झाला होता. यानंतर प्रत्येकजण वेब या सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहे. ‘तांडव’ सीरीजदरम्यान झालेल्या उलथापालथानंतर या वेब सीरीजचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता ही वेब सीरीज जून महिन्यात रिलीज होणार आहे .
ही वेब सीरीज कधी प्रसिद्ध होणार आहे, याची घोषणा या वेब सीरीज निर्माते राज निधिमोरू आणि कृष्णा डीके यांनी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, आम्हाला माहित आहे की आपण ‘द फॅमिली मॅन’च्या नवीन हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहात. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल खूप आभारी आहोत. आमच्याकडे आपल्यासाठी एक नवी अपडेट आहे. ‘फॅमिली मॅन सीझन 2’ या उन्हाळ्यात अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. हा सीझन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बरेच काम करत आहोत. आशा आहे की तुम्हाला हे खूप आवडेल.
पिंकविलाच्या अहवालानुसार, ‘द फॅमिली मॅन 2’ या जूनमध्ये रिलीज होणार आहे. मेकर्स राज आणि डीके यांच्यासह अॅमेझॉन प्राइम लवकरच या शोच्या अंतिम तारखेची घोषणा लवकरच करणार आहेत .
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी ही देखील मनोज बाजपेयीसमवेत ‘द फॅमिली मॅन सीझन 2’मध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडेच तिच्या वाढदिवशी निर्मात्यांनी सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेब सीरीजमध्ये आता समंथाच्या नावाची वर्णी लागली आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सॅम आणि हे वर्ष आनंदाने भरुन जाईल. राजीला या जगात आणण्याची आता वाट बघवत नाही.