वॉरेन बफेट यांचा उत्तराधिकारी असेल भारतीय वंशाचा

जगातील सर्वात यशस्वी अब्जाधीश गुंतवणूकदार, शेअर मार्केटचे जादूगार आणि बर्कशायर हॅथवेचे प्रमुख वॉरेन बफेट यांना त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बफेट म्हणाले की त्यांच्यानंतर Greg Abel कंपनीची जबाबदारी स्वीकारेल. सीएनबीसीला ते म्हणाले, जर आज रात्री मला काही झालं तर उद्या सकाळी ग्रेग एबेल कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी स्वीकारतील. ग्रेग सध्या बर्कशायर हॅथवेच्या नॉन-इश्योरेंस बिजनेसचे वाईस चेअरमन आहेत.

वॉरेन बफे सध्या 90 वर्षांचे आहेत, तरी आजपर्यंत त्यांनी कधीही आपल्या पदाचा राजीनाम्याबाबत कधीही उघडपणे वाच्यता केली नाही. 2018 पासून ग्रेग एबेल कंपनीचे वाईस चेअरमन आहेत. बर्कशायरकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिय मिळालेला नाही. बर्कशायरचे नवे प्रमुख कोण असतील याबद्दल सुमारे 15 वर्षांपासून चर्चा आहे. 2006 मध्ये जेव्हा वारेन बफेट 75 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी सर्वप्रथम शेअर्स धारकांना लिहिलेल्या पत्रात आपल्या उत्तराधिकाराबाबत उल्लेख केला होता. बफेट हे 1965 पासून बर्कशायर हॅथवे चालवत आहेत.

याशिवाय, बफेट यांनी सीएनबीसीला हे देखील सांगितले की Greg Abel यांना काही झाले तर अजित जैन हे CEO म्हणून कार्यभार स्वीकारतील. ते एक भारतीय अमेरिकन आहेत. बर्कशायर हॅथवेच्या विमा व्यवसायाची देखरेख अजित जैन करतात. अजित जैन हे ग्रेगपेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. असा विश्वास आहे की त्यांचा मुलगा हॉवर्ड यांना कार्यकारी अध्यक्ष करता येईल. त्यांचे इन्व्हेस्टमेंट मॅनेजर Todd Combs आणि Ted Weschler मुख्य गुंतवणूक कार्यालयाच्या लाइनमध्ये असतील.

Abel सध्या बर्कशायर हॅथवेचे बरेच व्यवसाय सांभाळतात. यात बर्कशायर एनर्जी, BNSF railroad, डेअरी क्वीन आईस्क्रीम, See’s Candies, Fruit of the Loom underwear यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यात 3 लाख 9 हजार कर्मचारी काम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.