चीनमध्ये ३५ दिवसांत ६० हजार लोकांचा मृत्यू

चीनमधील करोनाचे थैमान थांबायला तयार नाही. चीनमधून भीतीदायक आकडे समोर येत आहेत. नवीन माहितीनुसार चीनमध्ये मागच्या ३५ दिवसांत जवळपास ६० हजार लोकांचा मृत्यू ओढवला आहे. चीनमध्ये करोना नियमांमध्ये शिथीलता दिल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यूची आकडेवारी समोर येत आहे.

चीनमध्ये ८ डिसेंबर २०२२ पासून ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत एकूण ५९,९३८ मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोग यांच्या ब्युरो ऑफ मेडिकल अॅडमिनिस्ट्रिशेनचे प्रमुख जिओ याहुई यांनी पत्रकार परिषद घेऊन चीनमधील करोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती दिली आहे. ही आकडेवारी फक्त हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची आहे, प्रत्यक्षात करोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी यापेक्षा अधिक असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिओ याहुई यांनी सांगितले की, करोना व्हायरसमुळे रेस्पिरेटरी फेल्युअर झाल्यामुळे ५ हजार ५०३ मृत्यू झाले आहेत. यासोबतच ५४ हजार ४३५ त्या लोकांचा समावेश आहे, ज्यांना करोना सोबतच इतर आजार देखील होती. डिसेंबरच्या सुरुवातीला चीनने आपले झिरो कोविड धोरण शिथील केले होते. त्यानंतर करोनाने चीनमध्ये थैमान घालायला सुरुवात केली, असा आरोप सध्या चीनवर केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.