आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) सुरु असताना स्टार ऑलराऊंडर बॅट्समनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एनएआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वेस्टइंडिजचा कॅप्टन आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या धिप्पाड कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
किरॉन पोलार्डने सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. मुंबई संघाने एकूण पाच वेळा जेतेपद पटकावलेले असले तरी या हंगामात मुंबई संघ चांगली कामगिरी करु शकलेला नाही. किरॉन पोलार्ड सध्या याच संघाकडून खेळतोय. आयपीएलचा हा हंगाम अद्याप संपलेला नाही. असे असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय.
दहा वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न होते. मी मागील १५ वर्षांपासून एकदीवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र आता पूर्ण विचाराअंती मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे पोलार्डने सांगितले आहे.
किरॉन पोलर्ड आतापर्यंत १२३ एकदिवसीय तर १०१ टी-२० सामन्यांमध्ये खेळलेला आहे. त्याने एप्रिल २००७ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर २००८ साली त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. पोलार्ड सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे.