मेघालयातील काँग्रेसचे 12 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा पक्षविस्ताराचा धडाका सुरुच आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रात्री काँग्रेसवर पॉलिटिकल स्ट्राईक केला आहे. मेघालयातील काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामळं मेघालयात निवडणूक न लढवता ममता बॅनर्जींच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे.

मेघालय विधानसभेतील काँग्रेस पक्षाच्या 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे इथं 18 आमदार होते त्यापैकी 12 आमदार ममता यांच्या पक्षात गेले आहेत. माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.

मेघालयमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मोठा झटका दिलाय. विधानसभेची निवडणूक न लढता मेघालय मध्ये तृणमूल काँग्रेस बनला विरोधी पक्ष बनला आहे. आज दुपारी तृणमूल प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

मेघालयमधील विधानसभेची एकूण सदस्य संख्या 60 आहे. इथं भाजपच्या समर्थनातील एनडीएटे 40 आमदार आहेत. तर, काँग्रेसचे 18 आमदार होते. त्यापैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दोन तृतियांश आमदारांनी पक्षांतर केल्यानं काँग्रेसला बंडखोरी करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांवर पक्षातंर बंदी कायद्याअतंर्गत कारवाई करता येणार नाही. यामुळं मेघालयात आता काँग्रेसच्या जागी तृणमूल काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.