श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध प्रथम एकदिवसीय आणि नंतर टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी निवड समितीने संघ जाहीर केला आहे. पृथ्वी शॉला टी-20 संघात तर सूर्यकुमारची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा T20 संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय, 18 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, हैदराबाद
दुसरी वनडे, 21 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, रायपूर
तिसरी वनडे, 24 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, इंदूर
भारत-न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20, 27 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, रांची
दुसरा T20, 29 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, लखनौ
तिसरा T20, 1 फेब्रुवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, अहमदाबाद
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, सकाळी 9.30, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, सकाळी 9.30, दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, सकाळी 9.30, धर्मशाला
चौथी कसोटी, 9-13 मार्च, सकाळी 9.30, अहमदाबाद
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे, 17 मार्च, दुपारी 1.30, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, दुपारी 1.30 वाजता, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, दुपारी 1.30, चेन्नई