आज दि.५ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

केंद्र सरकारचा ट्विटरला शेवटचा इशारा

जवळपास तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने समाजमाध्यम क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, अशा कंपन्यांसाठी नवी नियमावली जारी केली. २६ मे पासून देशात नवी नियमावली लागू करण्यात आली. मात्र, ट्विटर इंडियानं अजूनही या नियमावलीनुसार अंमलबजावणी केली नसल्यामुळे आता केंद्र सरकारने ट्विटरला शेवटचा इशारा दिला आहे. याआधी २६ मे आणि २८ मे रोजी केंद्र सरकारने ट्विटरला पत्र पाठवून देखील त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर केंद्र सरकारने शेवटची नोटीस ट्विटरला पाठवली आहे. अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा केंद्र सरकारने नोटिशीमध्ये दिला आहे.

ट्विटर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टिक ट्विटरने काही काळासाठी हटवली होती. केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने अकाऊंटसमोर पुन्हा ब्लू टिक सक्रीय केली आहे. हा वाद संपत नाही तोच तोच ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकली आहे. मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टीक काढून टाकल्याने विश्व हिंदू परिषदेने तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना ट्विटरची तुलना थेट ईस्ट इंडिया कंपनीशी केलीय

१० मोठ्या सरकारी कंपन्यांची
भागीदारी विकण्याचा सरकारचा निर्णय

अनेक मोठ्या सरकारी उपक्रमांमधून केंद्र शासन आता माघार घेऊन निर्गुंतवणूकीकडे वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १० मोठ्या सरकारी कंपन्यांची भागीदारी विकण्याचा सरकारचा निर्णय झाल्याचे समजते. केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील १० उपक्रमांमध्ये निर्गुंतवणुकीची योजना आहे. यासाठी संपूर्ण खासगीकरणाचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो आर्थिक वर्ष २०२१-२०२२ च्यासाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य १.७५ लाख कोटी आहे.

गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’ कायद्याला मंजुरी

गुजरातमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ‘लव्ह जिहाद’ कायद्याला मंजुरी दिली आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. हा कायदा गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पास केला होता. त्यानंतर मंजुरीसाठी राज्यपाला आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवण्यात आला होता. हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मातर थांबवण्यासाठी आपले सरकार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी एका निवडणूक प्रचारसभेत सांगितले होते.

भारतात मुलांसाठी याच महिन्यात
स्वदेशी लस उपलब्ध होणार

भारतात मुलांसाठी याच महिन्यात स्वदेशी लस उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. झायडस कॅडिलाच्या स्वदेशी लसीचे तिसऱ्या टप्यातील परीक्षण पूर्ण झाले आहे. दोन आठवड्यांच्या आत कंपनी ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून त्याच्या आपात्कालीन वापराची परवानगी मागण्याची शक्यता आहे. लसीसाठी निर्मित उच्चाधिकार समितीचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झायडस-कॅडिलाच्या लस ट्रायलमध्ये १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचाही समावेश करण्यात आला.

केंद्र सरकारने फक्त
श्रेय घेतले : अमर्त्य सेन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भारतातील करोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची भूमिका मांडली आहे. “या सर्वच बाबतीत एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचं श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रीत केलं. कोविड-१९ चा प्रसार रोखण्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं आणि भारतात करोनाची ही परिस्थिती निर्माण झाली”, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात प्रथमच तृतीय
पंथीयांसाठी आश्रमाचा शुभारंभ

तृतीय पंथीयांसाठी सरकारी कामात लागणाऱ्या वस्तू तयार करण्याचा उद्योग सरकारने सुरु करुन दिला पाहिजे. ते सक्षम झाले तर देश सक्षम होईल”, असे विधान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले. कल्याण पूर्व भागात द्वारली परिसरात तृतीय पंथियांसाठी सुरु करण्यात आलेल्या आश्रमाचा शुभारंभ आमदार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ‘किन्नर अस्मिता’च्या निता केणे, तमन्ना केणे, सचिन तांबे आणि माधूरी शर्मा आदी उपस्थित होते

अंधश्रद्धेच्या नावाखाली 3 वर्षाच्या
चिमुकल्याच्या पोटाला दिले ७० चटके

मेळघाटातील आदिवासी भागात संतापजनक प्रकार समोर आला आहे. यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही. अंधश्रद्धेच्या नावाखाली 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या पोटाला चटके देण्यात आले आहे. चिमुकल्याच्या पोटाला गरम सळईचे 70 हून अधिक चटके देण्यात आले आहे. सध्या त्या चिमुकल्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

मानाचा निवृत्तीनाथ पालखी
सोहळा यंदा अडचणीत

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर आहे. आषाढी वारीसाठी या समाधी मंदिरातून सर्वप्रथम निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते त्यानंतर राज्यातून सर्वत्र पालख्यांचे प्रस्थान होत असते. मानाचा पालखी सोहळा असलेल्या संत निवृत्तीनाथ पालखी व्यवस्थापनासाठी अद्याप समितीच नेमण्यात आली नाही.

गूगल ने मागितली
कन्नड भाषकांची माफी

गूगलवर मोठ्या प्रमाणावर विविध गोष्टींचा शोध घेतला जातो. गूगलवर ‘भारतातील सर्वात खराब भाषा कोणती’ असं सर्च केल्यास कन्नड असं दाखवलं जात आहे. यानंतर कन्नड भाषिकांनी सोशल मीडियावर या प्रकारचे अनेक स्क्रीनशॉट शेअर करत गूगलवर जोरदार हल्ला चढवला. हा सर्व प्रकार इतका टोकाला गेला की राज्य सरकारने थेट गूगलला नोटीस धाडण्याचा इशारा दिला आहे. गूगलने कन्नड भाषिकांची ट्विटद्वारे माफी मागितली आहे.

केंद्र सरकार म्हणते तिसरी
लाट येणार, काळजी घ्या

कोरोना व्हायरसची दुसरी लाट आता काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. पण कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकराक आहे. कारण देशात तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के सारस्वत यांच्या म्हणण्यानुसार आपण कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात यशस्वी ठरलो आहोत. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेतून बाहेर येण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

नौदलाची ताकद वाढणार,
आणखी सहा पाणबुड्या घेणार

भारतीय नौदलाची ताकद वाढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. नौदलाची ताकद वाढण्यासाठी 6 अत्याधुनिक पाणबुड्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकल्प रखडला होता. आता त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
बचावले, पीओपी स्लॅबसह कोसळले

सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले.
अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आदित्य ठाकरे आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

पहाटेचा शपथविधी ही
100% चुकच : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.