लष्कराबद्दल वादग्रस्त ट्वीट : शेहला रशीद यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास परवानगी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) माजी उपाध्यक्ष शेहला रशीद शोरा यांनी भारतीय लष्करावर केलेल्या ट्वीटसाठी त्यांच्यावर खटला चालविण्यास दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी परवानगी दिली.

नवी दिल्लीतील वकील अ‍ॅड. आलोक श्रीवास्तव यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे विशेष सेल पोलीस ठाण्यामध्ये शोरा यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ए अंतर्गत २०१९ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. शोरा यांच्या ट्वीटमुळे वेगवेगळय़ा गटांमधील शत्रुत्व वाढवण्याचा आणि सद्भाव राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शोरा यांनी १८ ऑगस्ट २०१९ रोजी हे ट्वीट केले होते. काश्मीरमधील घरांमध्ये घुसून स्थानिकांचा छळ केल्याचा आरोप या ट्वीटमध्ये शोरा यांनी लष्करावर केला होता. ‘सशस्त्र सेना रात्रीच्या वेळी घरात घुसतात, मुलांना उचलतात, घरांची मोडतोड करतात,’ अशा आशयाचे हे ट्वीट होते. मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून लष्कराने फेटाळून लावले. गृह विभागानेही निरीक्षण केले की, लष्करावरील हे आरोप खोटे आणि तथ्यास धरून नसल्याचे सांगितले. ‘जम्मू आणि काश्मीरमध्ये धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल शोराच्या ट्वीटवर कारवाई करणे आवश्यक आहे आणि भादंविच्या कलम १५३ए अंतर्गत खटला चालवला जावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यास दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी परवानगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.