हार्दिक ब्रिगेड सुसाट, लखनऊ सुपर जाएंट्सचा दारुण पराभव
आयपीएल 2023 मध्ये 51 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने लखनऊवर दणदणीत विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने 56 धावांनी लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव केला असून आयपीएलमधील 7 वा सामना जिंकून पॉईंट टेबलमध्ये अभेद्य आघाडी घेतली आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार कृणाल पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तेव्हा गुजरातकडून ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली. दोघांनी मैदानात तुफान फटकेबाजी करत संघासाठी तब्बल 142 धावांची पार्टनरशीप केली. गुजरातकडून ऋद्धिमान साहाने 81, हार्दिक पांड्याने 25, डेविड मिलर 22 तर शुभमन गिलने नाबाद 94 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 227 धावा केल्या.
‘शिवसेनेने मला मोठी ऑफर..’ गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या महिलेचा आरोप
नवी मुंबईचे भाजपा नेते गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं बलात्काराचे आरोप मागे घेतले आहेत. दीपा चव्हाण यांनी आमदार गणेश नाईक यांच्याबाबत बलात्काराची केलेली तक्रार मागे घेणारे पत्र नेरूळ पोलीस ठाण्यात दिले आहे. एप्रिल 2022 ला दीपा चव्हाण यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली होती. यासाठी शिवसेनेकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शरद पवार पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी, दर्शनानंतर व्यक्त केलं समाधान
शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यापासून दोन दिवस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, पक्षनेते, कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीची निर्णय मागे घेत असल्याची घोषणा शुक्रवारी ( ५ मे ) शरद पवारांनी केली. यानंतर शरद पवार आज ( ७ मे ) पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी पवारांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे.२०१७ नंतर शरद पवार विठुचरणी आले होते. तेव्हा ‘एबीपी माझा’शी बोलताना शरद पवारांनी सांगितलं, “देशात फार ठिकाणी मंदिरात जात नसतो. पण, काही मंदिर ही माझ्या अंत:करणात आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळतं.”
कुस्तीगीरांच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, खाप पंचायतीमुळे बळ
भारतीय महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्याविरोधात जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आज शेतकरी संघटना आणि खाप पंचायतीचे बळ मिळाले. आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणा आणि पंजाबमधील अनेक नेत्यांनी खेळाडूंची भेट घेतली. दरम्यान, शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. ब्रिजभुषण सिंह यांना १५ दिवसांत अटक न झाल्यास मोठा निर्णय घेतला जाईल, असं टिकैत म्हणाले. आज तकने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.रविवारी सायंकाळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, “कुस्तीगीरांनी न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवावा. ब्रिजभुषण सिंह याला अटक व्हावी अशी युनायटेड किसान मोर्चा आणि खापची मागणी आहे. २१ मेपर्यंत ब्रिजभुषणला अटक न केल्यास मोठा निर्णय घेतला जाईल”, असंही ते म्हणाले.
कर्नाटकात राहुल गांधींचा हटके अंदाज, डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका
कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैर झडत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकात ठाण मांडून आहेत. त्यातच राहुल गांधींचा हटके अंदाज आज समोर आला आहे. राहुल गांधी यांनी डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून फेरफटका मारला आहे.प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये राहुल गांधी ठिकठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशातच राहुल गांधी डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून फेरफटका मारत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहचले. राहुल गांधींनी डिलीव्हरी बॉयबरोबर दुचाकीवरून २ किलोमीटर प्रवास केला. त्यापूर्वी राहुल गांधींनी एका चिमुरड्याशी आपुलकीने चर्चा करत, फोटो काढल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
“कर्नाटकात काँग्रेस जिंकेल, कारण…”, शरद पवारांचा दावा
कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वपक्षीय नेते रस्त्यांवर उतरून सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रत्यक्षात कर्नाटकात हजर राहत रॅलींना संबोधित केलं आहे. अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण, या निवडणुकीच्या निकालावर देशभरातील इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसच जिंकेल असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली.“दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपाची सत्ता नाही. देशाचा नकाशा पाहिलास अनेक राज्यात भाजपा सत्तेवर नाही. इतर राज्यात नॉन भाजपा सरकार आहे”, असं शरद पवार म्हणाले. “कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार”, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
SD Social Media
9850 60 3590