अभिनेत्री सारिका यांचा आज वाढदिवस

जन्म. ३ जून १९६०

त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री सारिका. माहेरचे नाव सारिका ठाकूर. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. सारिका इंडस्ट्रीमधील सगळ्यात यशस्वी बाल कलाकार आहे. अभिनेत्री सारिका आणि सचिन पिळगावकर या जोडीने बालकलाकार म्हणून काम केले होते. दोघांनी गीत गाता चल या चित्रपटात कामही केले होते. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर सारिकाच्या आईला ही गोष्ट कळाली आणि त्या खूप नाराज झाल्या. नंतर अखियोंके झरोकेसे हा चित्रपट सारिकाला आपल्या आईच्या सांगण्यावरून सोडावा लागला. कारण गीत गाता चल मधील सचिन आणि सारिकाची जोडी गाजली होती. आणि राजश्री प्रॉडक्शन या दोघांना घेऊन अखियोंके झरोकेसे हा चित्रपट बनवणार होते. पण सारिकाच्या आईने याला जोरदार विरोध केला. अखेर रंजिता कौर या अभिनेत्रीला घेऊन हा चित्रपट तयार झाला. नंतर सारिका आणि सचिन दूर झाले आणि त्यांची लव्ह स्टोरी संपली.सारिका यांनी गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले. यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांनी अनेक वर्षांपूर्वी पारध या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत.

करिअर यशाच्या शिखरावर असताना कमल हसन यांच्या प्रेमात बुडालेल्या सारिका यांनी सगळे काही सोडले होते. त्याचवेळी कमल हासनचा पूर्व पत्नी वाणीसोबत घटस्फोटाचा खटला सुरू होता. यामुळे कमल हासन आर्थिकदृष्ट्या कमजोर झाले होते. अशा वेळी ते सारिकाशी लगेच लग्न करण्यास तयार नव्हता. सारिका कमलबरोबर लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहायला सुरुवात केली तेव्हा असे संबंध मान्य नव्हते. लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले. ३५ वर्षां पुर्वी फिल्मफ़ेअर मासिकात एक लेख आला होता” Those who speaks with their eyes” या आर्टिकल मधे तिच्या डोळ्यांचे वर्णन ” एका छोट्या मांजरी सारखे दिसतात असे केले होते आणि बिंदुचे डोळे एखाद्या बोक्या सारखे दिसतात असे केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.