भारतातील आघाडीच्या दूध उत्पादन कंपन्यांपैकी एक असलेल्या अमूलच्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. या बदलामुळेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जीसीएमएमएफचे सीओओ जयन मेहता यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपवण्यात येणार आहेत.
गेल्या १३ वर्षांपासून सोधी हे व्यवस्थापकीय संचालक होते. २०१० मध्ये अमूल कंपनीत त्यांनी वरिष्ठ मॅनेजर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर कंपनीने त्यांची पदोन्नती करत कार्यकाळ आणखी ५ वर्षे वाढवला होता.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन बोर्डाच्या बैठकीत सोधी यांच्या राजीनाम्याबाबत खुलासा झाला होता. जीसीएमएमएफ प्रामुख्याने गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि मुंबईतील बाजारांमध्ये दूध विक्री करते. दर दिवशी १५० लाख लीटरहून जास्त दुधाची विक्री केली जाते.
आरएस सोधी यांनी १९८२ मध्ये पहिल्यांदा अमूलमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर २००० ते २००४ या काळात त्यांनी जनरल मॅनेजिंग मार्केटिंगची जबाबदारी सांभाळली होती. त्यानतंर २०१० मध्ये कंपनीने त्यांना एमडी केले. तर जुलै २०२२ मध्ये त्यांनी इंडियन डेअरी असोसिएशनचं अध्यक्ष करण्यात आलं होतं.
बोर्डाच्या अध्यक्षांनी सोधी यांचा राजीनाम स्वीकारला आहे. आता सोधी यांच्या जबाबदाऱ्या जयन मेहता सांभाळणार आहेत. याआधी जयन मेहता यांना प्रभारी करण्यात आलं होतं.