आज दि.२७ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

दादा घेणार अमृता वहिनींची भेट, कारण… अजित पवारांची विधानसभेत तुफान बॅटिंग

हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. विधानसभेत केलेल्या भाषणात अजित पवारांनी अमृता फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांचं नाव घेऊन तुफान फटकेबाजी केली.’देवेंद्रजींकडे 6 खाती आहेत ना, अजून तुमच्या खात्यांचा भार त्यांच्या खांद्यावर कशाला टाकता? 6 पालकमंत्री पदं त्यांच्याकडे आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण त्यांनी 6 पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त होणार नाही? भाजपलाही महिलांची मतं मिळाली. 6 महिन्यात अजून एक महिला सापडेना मंत्री करायला? हा कुठला कारभार आहे? मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघा यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतलं तर लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे’, असा टोला अजित पवारांनी हाणला.

तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार; शेवटचा निरोप देताना कुटुंबियांना अश्रू अनावर

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं रविवारी मालिकेच्या सेटवर आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या 20 व्या तुनिषानं इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज अखेर तुनिषावर मिरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाला अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबिय, नातेवाईक तसंच सिनेक्षेत्रातील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती. आज म्हणजेच 27 डिसेंबर 2022 रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाने तिचा सहकलाकार शीझान खानसोबतच्या ब्रेकअपमुळे आत्महत्या केली केल्याचं म्हटलं जात आहे. ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या शोच्या सेटवर तिने मृत्यूला कवटाळले. आज अखेर तिच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. यावेळी तिच्या जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या.

सुशांत सिंग प्रकरणात शवागार सेवकाच्या दाव्याने खळबळ

अभिनेता सुशांत सिंग  राजपूत मृत्यूप्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्राच्या राहत्या घरी मृत्यू झाला. त्यानं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं असं तपासांती पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता दोन वर्षांनी या प्रकरणात नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्यानं सुशांतच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे. आता या प्रकरणानंतर सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली  दावा कूपर हॉस्पिटलचे शवागार सेवक रूपकुमार शाह यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावर सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर श्वेताने भाऊ सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घ लढा दिला, जो अजूनही सुरू आहे. या प्रकरणात सुशांतला न्याय मिळण्याची फारशी आशा नव्हती, मात्र रूपकुमार शाहच्या दाव्यानंतर सुशांतला आता न्याय मिळू शकेल असा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

वणी गडावर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात, 23 जण जखमी

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला. चालकाचे पिक ट्रकवरचे नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यातच उलटली.वणी गडापासून एक किमी अंतरावरच हा अपघात झाला असून यात २३ जण जखमी झाले आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालेगावमधील दाभाडी इथले भाविक देवीच्या दर्शनासाठी वणी गडावर निघाले होते.सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरच गाडीचा अपघात झाला. मालवाहतूक करणाऱ्या गाडीतून सर्वजण दर्शनाला चालले होते.

बारावी पास रँचोची कमाल, YouTube चा वापर करून बनवले हेलिकॉप्टर!

उपलब्ध वस्तूंवर संशोधन करून नवं उपकरण तयार करणारा थ्री इडियट्स सिनेमातील रँचो सर्वांना माहिती आहे. सोशल मीडिया आणि त्यातही यूट्यूबरील व्हिडीओ पाहून गावागावातील रँचोंच्या कल्पनांना बळ आलंय. औरंगाबादच्या एका रँचोनं यूट्यूबचा वापर करून थेट हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.औरंगाबादच्या शासकीय आयटीआयमध्ये शिकत असलेल्या सतीश मुंडे असं या रँचोचं नाव आहे. त्यानं जुन्या कारच्या साहित्यामधून हेलिकॉप्टर बनवलं आहे. सतीश मुंडे हा मूळचा परळी येथील असून तो कुटुंबीयांसोबत वाळूज भागात राहतो. त्याचे वडील कंपनीत काम करतात तर आई गृहिणी आहे. त्याला एक भाऊ आहे. सतीशला लहानपणापासूनच हवेत उडणाऱ्या वस्तूबद्दल कुतूहल होतं लहानपणापासूनच आपण हेलिकॉप्टरमध्ये बसावं असं त्याची इच्छा होती.

१००व्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरचे द्विशतक! मात्र सेलिब्रेशन पडले महागात; सचिनच्या विक्रमाची बरोबरी

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट विश्वात इतिहास रचताना एक मोठा विक्रम केला आहे. त्याने आपला १००वा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याने द्विशतक झळकावले. मात्र यादरम्यान वॉर्नरने जोरदार आनंद साजरा केला आणि तो जखमी झाला. यानंतर त्याला दुखापतग्रस्त रिटायर व्हावे लागले. त्याने २५४ चेंडूत २०० धावा केल्या. यादरम्यान त्याने १६ चौकार आणि दोन षटकार मारले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.