13 व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली तमन्ना आज आहे इतक्या कोटींची मालकीण

तमन्ना भाटियाने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण तरीही तिने दक्षिणेतील बड्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव सामील आहे.तमन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला असून तिचे वडील संतोष भाटिया हे हिरे व्यापारी आहेत.

यानंतर तमन्ना एक वर्ष मुंबईतील पृथ्वी थिएटरचा भाग होती. दरम्यान, 2005 मध्ये रिलीज झालेल्या अभिजीत सावंतच्या अल्बम ‘लफझों में’ या गाण्यातही तिने काम केले होते.काही काळ त्यांनी मॉडेलिंग आणि काही टीव्ही जाहिरातीही केल्या. तमन्ना भाटियाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘चांद सा रोशन चेहरा’. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला.

दरम्यान, तमन्नाने काही व्हिडिओ अल्बममध्येही काम केले. नंतर तिने आपला मोर्चा तेलुगू आणि तमिळ चित्रपटांकडे वळवला. 2005 मध्ये तमन्ना ‘श्री’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर एकामागून एक चित्रपटांमध्ये अभिनय करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आणि लवकरच ती साऊथची मोठी स्टार बनली.त्यानंतर 2013 मध्ये तमन्नाने हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. अजय देवगणसोबत ‘हिम्मतवाला’ चित्रपटात ती दिसली होती. तर 2014 मध्ये ‘हमशकल्स’ चित्रपटात काम केले.

तसेच ती अक्षयसोबत ‘एंटरटेनमेंट’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. पण तिला खरी ओळख मिळाली ती सुपरहिट चित्रपट बाहुबली मधून.तमन्नाचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री एका चित्रपटासाठी 1.5 ते 2 कोटी रुपये घेते.

तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर एका अहवालानुसार ती 15 दशलक्ष म्हणजे सुमारे 110 कोटी रुपयांची मालकीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.