भोपळा ही अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. बहुतेक लोक भोपळा खातात. परंतु त्याच्या बिया फेकून देतात. पण असे केल्याने तुम्ही अनेक प्रकारचे आरोग्य फायदेही काढून टाकता. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने सर्वांनाच फायदा होतो, परंतु पुरुषांना याचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.
भोपळ्याच्या बियांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, कर्करोग, पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. या बियांमध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रोटीन, ऊर्जा, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स, झिंक, सोडियम, थायामिन, फोलेट, फॉस्फरस इत्यादी असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या निर्माण होण्यापासून बचाव होतो.
भोपळ्याच्या बियांचे फायदे
– भोपळ्याच्या बिया त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात.
– यामध्ये फायबर असल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी होते.
– पोटात जंत होण्याची समस्या टाळते.
– शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही.
– भोपळ्याच्या बिया मेंदूला निरोगी ठेवतात.
– युरिन इन्फेक्शन, युरिनरी इन्कॉन्टीनन्स, यूटीआय यासारख्या समस्या दूर करते.
– रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया खा.
– यामध्ये असलेले काही घटक उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.
– पचनशक्ती, हाडांना बळ देते. मूत्राशयात स्टोन होऊ देत नाही.
– हे हृदयासाठी आरोग्यदायी आहे. झोप न येण्याची समस्या दूर होते.
पुरुषांसाठी भोपळ्याच्या बियांचे फायदे
– प्रोस्टेटचे आरोग्य राखण्यासाठी पुरुषांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. प्रोस्टेट ही एक प्रकारची ग्रंथी आहे, जी वीर्य निर्माण करण्यास मदत करते. पुरुषांमध्ये वाढत्या वयाबरोबर प्रोस्टेटचा आकारही वाढतो. मात्र त्याचा आकार जास्त वाढू नये अन्यथा इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत भोपळ्याच्या बियांचे सेवन करून ही ग्रंथी निरोगी ठेवता येते.
– ज्यांना अशक्तपणा जाणवतो, त्यांनी भोपळ्याच्या बिया नक्की खाव्या. भोपळ्याच्या बिया खाल्याने शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरपूर राहाते. यासाठी भोपळ्याच्या बिया भाजून स्नॅक्समध्ये खाऊ शकता. याच्या वापराने तुमची प्रतिकारशक्ती आणि पचनक्रिया दोन्ही मजबूत राहतात.