डिसेंबर हा थंडीचा महिना असला तरी सध्या वातावरणीय बदलामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांताक्रूझ येथे देशभरातील डिसेंबरमधील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३५.५ आणि शनिवारी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आणखी काही दिवस तापमानात वाढ होत राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला.
राज्यभरातील बहुतांशी शहरांच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या महिन्यातच असह्य उकाडा जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांताक्रूझ येथील तापमान ३५.५ आणि ३५.९ अंश सेल्सिअस होते. हे तापमान देशात सर्वोच्च असल्याने थंडीच्या हंगामातील ‘उष्ण शहर’ अशी नोंद झाली आहे