‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, वनिता खरात, गौरव मोरे यांसारखे कलाकारांमुळे कार्यक्रमाला रंगत येते. या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात नाटक, मालिका चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येते. मात्र आता एका हिंदी चित्रपटाचे प्रमोशन यात करण्यात येणार आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुचर्चित सर्कस’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हिंदीप्रमाणे मराठीतील अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. रणवीर सिंगसह ‘सर्कस’ची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशातच चित्रपटाच्या टीमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. IWM बझ यांनी एक व्हिडीओ शेअर ही माहिती दिली त्यामुळे साहजिकच आता चाहत्यांमध्ये हा भाग बघण्याची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांना धमाल विनोदी स्किट्स आणि सर्कस चित्रपटातील किस्से ऐकायला मिळणार आहेत.
दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट २३ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे. ‘सर्कस’मध्ये रणवीर सिंगबरोबर जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.