‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक घराबाहेर पडले. यांच्याबरोबरीने वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ स्पर्धकदेखील बाहेर पडले, त्यांच्याबरोबरीने डॉ. रोहित शिंदेही बाहेर पडला.
या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, स्नेहलता वसईकर, प्रसाद जवाडे यांच्यापैकी घराबाहेर स्नेहलात वसईकर हिला घराबाहेर पडावे लागले आहे. या नव्या भागात बऱ्याच लोकांनी प्रसादबद्दल नाराजी व्यक्त केली होती, पण जनता जनार्दनच्या कृपेने प्रसादचं घरात स्थान पुन्हा निश्चित झालं आहे.
घरातून बाहेर पडताना स्नेहलता चांगलीच भावूक झाली. घरातील इतर स्पर्धकांनीही स्नेहलता बाहेर जाणार नाही असा विश्वास दर्शवला होता, पण नेमकं तिलाच या घरातून बाहेर पडावं लागल्याने इतर स्पर्धकही खूप भावूक झाले. घरातून बाहेर पडताना स्नेहलता म्हणाली, “मी कुणाला नकळत दुखावलं असेल तर मी त्यांची माफी मागते पण मला खोटं नाही वागता येत.”
आता पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? यासाठी कार्यक्रम पुढच्या आठवडयात बघावा लागेल.