पुण्यात काल रात्री मोठी दुर्घटना घडली. पुण्यातील नवले ब्रिज येथे भीषण अपघात झाला. एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
आणखी दोन भीषण अपघात –
नवले ब्रिजच्या भीषण अपघातानंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सात गाड्यांना टेम्पोने उडवले. यानंतर आणखी एक भीषण अपघात कात्रज रस्त्यावर झाला. दुचाकीच्या झालेल्या या तिसऱ्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन्ही घडलेल्या भीषण अपघातात एकाचाही मृत्यू नाही. मात्र, 48 गाड्यांच्या अपघातात तिघे गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकुण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले असून तसेच पीएमआरडीए, अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. किमान 10 जखमींवर शासकीय रुग्णवाहिका 108 मधे उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.
या घटनेची माहिती समजताचा घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी करण्यात आली. यावेळी अपघातात जखमींना नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिले आहे. या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिले आहेत.