बस, आता एवढंच ऐकायचं राहिलं होतं, बलात्कार प्रकरणावर तापसी पन्नूची संतप्त प्रतिक्रिया

छत्तीसगड उच्च न्यायालयाने वैवाहिक बलात्काराबाबत वादग्रस्त निर्णय दिला. त्यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आता इतकंच ऐकायचं राहिलं होतं असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तापसीने न्यायालयाच्या निर्णयावर ट्विट करत आपली भूमिका मांडली. दुसरीकडे प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने देखील या निर्णयावर संताप व्यक्त केलाय.

एका खटल्यावर निकाल देताना छत्तीसगड उच्च न्यायालयाने वैवाहिक बलात्काराचा आरोप फेटाळला. तसेच पतीने कायदेशीर पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार होत नाही, असा निर्णय दिला. यावर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विट करत म्हटलं, “बस, आता एवढंच ऐकायचं राहिलं होतं.”

तापसी पन्नू शिवाय गायिका सोना मोहापात्राने ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “या भारताला वाचून मला जो आजार जाणवत आहे तो इतर कोणत्याही गोष्टीपलिकडचा आहे. याविषयी मी इथं लिहू शकते.”

पीडित महिलेने 2017 मध्ये रायपूरच्या चंगोराभाटा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसातच पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. यानंतर पीडितेने नवरा आणि सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन हे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती.

छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना मोठा निर्णय दिलाय. यात पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार नाही, असं म्हटलंय. याचिकाकर्त्या पीडित महिलेने आपल्या पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रा करत वैवाहिक बलात्काराचा आरोप केला होता. याशिवाय लग्नानंतर सासरच्यांकडून छळ होत असल्याचाही आरोप होता. न्यायालयाने यावर सुनावणी करताना आरोपी पतीला निर्दोष मुक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.