जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे बार्टीचे आवाहन

जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याचं आवाहन
दिनांक 16 नोव्हेंबर 2021पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेला आहे. त्यामुळे विविध जिल्हयातून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करणेबाबत बार्टी कडे विनंती केलेली होती.

सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्या करिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने, अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणासाठी
दिनांक 17 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सुचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही ही बार्टी मार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आली आहेत. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 09 डिसेंम्बर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.