गर्भवती महिलेस कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सकस व संतुलित फलहार घ्यावा. कोविड झाल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. वेळोवेळी आवश्यक असलेल्या चाचण्या कराव्यात आणि अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात डॉक्टरांची वेळ घेऊन जावे, असा सल्ला जळगाव शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिला.
आयएमए जळगावतर्फे ‘कोविड आणि गर्भावस्था’ या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. अंजली भिरुड, डॉ. विलास भोळे, डॉ. जितेंद्र कोळी हे सहभागी झाले होते.