काल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल येथे भारतीय सैन्य दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरा केली. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज गडचिरोली येथे पोलीस दलातील जवानांसोबत दिवाळी साजरा करणार आहे.
मुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. माओवाद्याच्या कारवाया असलेल्या अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात मुख्यमंत्री पोलीस दलातील जवानांसोबत दिवाळी साजरा करणार आहे. तसेच यानंतर ते जनजागरण मेळाव्यात स्थानिक आदिवासी नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.
धोडराज पोलीस या अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जवानांसोबत दिवाळी साजरा करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी सुद्धा ते अनेकदा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करायचे.
पंतप्रधानांचीही जवांनांसोबत दिवाळी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सोमवारी कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यावेळी ते म्हणाले की, भारताने नेहमीच युद्धाकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहिले आहे. पण, देशावर वाईट नजर ठेवणाऱ्या कोणालाही चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद आणि रणनीती भारताच्या सशस्त्र दलांकडे आहे.