2016 मध्ये हरवलं… पण नंतर इंग्लंडला जिंकून दिले 2 वर्ल्ड कप
इंग्लंडनं पाकिस्तानला हरवून 2010 नंतर दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. गेल्या तीन वर्षातलं आयसीसी स्पर्धेतलं हे इंग्लंडचं दुसरं मोठं विजेतेपद ठरलं. पण या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा हीरो एकच होता. तो म्हणजे बेन स्टोक्स. स्टोक्सनं मेलबर्नमधल्या फायनलमध्ये नाबाद अर्धशतकी खेळी करुन इंग्लंडला विश्वविजेता बनवलं. तो 2019 सालीही इंग्लंडच्या विजयाचा हीरो होता. पण याच बेन स्टोक्सला 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.याच स्टोक्सनं आज मेलबर्नवर पुन्हा एकदा मॅजिकल इनिंग केली. पाकिस्तानी तोफखान्यासमोर इंग्लंडचा संघ गडबडला होता. पण स्टोक्सनं शांतपणे डाव पुढे नेला. शाहीन आफ्रिदीचं मैदानाबाहेर जाणं आणि इफ्तिकार अहमद या नव्या बॉलरकडे बाबरनं दिलेली जबाबदारी ही स्टोक्ससमोर गिअर चेंज करण्याची एक मोठी संधी ठरली. आणि त्याचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला. स्टोक्स पुन्हा इंग्लंडच्या विजयाचा हीरो ठरला. या दोन्ही मॅचमधली स्टोक्सची कामगिरी क्रिकेट विश्वात दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरेल.
ठाकरेंच्या शिवसेनेला मालवणात मोठा धक्का, भाजपचे 6 ही उमेदवार विजयी
मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संस्था मतदारसंघातून भाजपचे 6 पैकी 6 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालवणात मोठा धक्का बसला आहे. पहिल्या 6 ही जागा भाजप पुरस्कृत पॅनलने जिंकल्या आहेत. भाजपचे अशोक सावंत यांनी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला आहे.
मालवण खरेदी विक्री संघाची ही मोठी अपडेट आहे. आघाडी व युतीच्या पॅनलमध्ये खरी लढत होती. तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार नशीब आजमावत होते. आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील आणी बालेकिल्ल्यात ही महत्त्वपूर्ण निवडणूक होती. शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यावर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे वैभव नाईक यांचे कसब लागणार असल्याचे म्हटलं जात होतं. शेवटी वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे.
केबीसीच्या मंचावर आला मजुराचा लेक; म्हणाला ‘समाजात इज्जत कमावण्यासाठी…’
सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा अमिताभ बच्चन यांचा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ दिवसेंदिवस मजेशीर होत आहे. शोमध्ये, जिथे बिग बी आपल्या उत्कृष्ट होस्टिंग शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, तर काहीवेळा ते आपल्या शब्दांनी शोच्या स्पर्धकांना भावूक देखील करतात. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे.या शोमध्ये आतापर्यंत सर्व प्रकारचे स्पर्धक सहभागी झाले आहेत. काहींनीप्रेक्षकांना खळखळून हसवलं तर काहींच्या कहाणीने बिग बींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणलं. अमिताभही या सर्व स्पर्धकांमध्ये अशा प्रकारे मिसळतात की त्यांच्यासमोर बसलेले स्पर्धकही त्यांचे सर्व दु:ख विसरून कोणत्याही दबावाशिवाय हा खेळ खेळतात. केबीसीच्या मंचावर आता असा स्पर्धक येणार आहे ज्याच्या आयुष्याची गोष्ट ऐकून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. या स्पर्धकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
केबीसीचा हा प्रोमो खूप भावूक करणारा आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात राजस्थानच्या भिलवाडा शहरातील स्पर्धक मोहसिन खान मन्सूरी सामील झाले आहेत. तो म्हणतोय, ‘मी आतापर्यंत एमए केलं, अनेक मुलाखती दिल्या, पण लोकांनी मला सांगितलं की तू एका मजुराचा मुलगा आहेस. आणि मजुराचा मुलगा मजुरीच करेल. मला समाजात मान सन्मान मिळवायचा आहे.’ यावर अमिताभ बच्चन त्याला ‘मजुराचा मुलगा मालक बनू शकतो.’ म्हणत धीर देतात.
‘पेराल तेच उगवेल, पवार कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर’, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
शरद पवारांनी राज्यात अनेक घरं फोडली, त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच उगवत आहे. शरद पवारांच्या घरात उभी फूट पडण्याचं वातावरण तयार झालं आहे, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची सूज आली होती. सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली आहे. आता त्यांच्या पोटात दुखत आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
‘भारतीय जनता पार्टी विचाराने प्रेरित होऊन काम करते, म्हणून आमचा एकही आमदार फुटणार नाही. पवारांच्या घरात उभी फूट पडते का काय, असं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे. तुम्ही राज्यातली एवढी घरं फोडली, एवढ्या लोकांना फोडलं, त्यामुळे तुम्ही जे केलं, तुम्ही जे पेरलं, ते उगवणार आहे. हा भाजपचा आणि भाजपच्या विचारांचा विजय आहे,’ असं पडळकर म्हणाले.
शमीनं उतरवला पाकिस्तानचा तोरा… अख्तरच्या ट्विटवर म्हणाला, ‘यालाच म्हणतात कर्मा ‘
इंग्लंडनं मेलबर्नमध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकून मोठा इतिहास घडवला. जोस बटलरच्या इंग्लंडनं दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी पटकावली. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला इंग्लंडसमोर फारशी चमक दाखवता आली नाही. पण आता पाकिस्तानच्या या पराभवानंतर शमीनं केलेलं ट्विट चांगलच चर्चेत आहे.मोहम्मद शमीनं आपल्या ट्विटमध्ये विजेत्या इंग्लंड संघाचं अभिनंदन केलं आहे. पण त्याच ट्विटवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं ब्रोकन हार्टचा इमोजी रिप्लाय केला. त्यावर शमीनं रिप्लाय देत चांगलीच खिल्ली उडवली. शमीनं या ट्विटमध्ये शोएबला रिप्लाय देताना म्हटलंय… ‘सॉरी भावा… पण यालाच म्हणतात कर्मा…’
देशात 10 लाख नोकऱ्या देण्याबाबत PM मोदींचा मास्टर प्लॅन रेडी
बेरोजगारी आणि नोकर्या प्रमुख राजकीय समस्या म्हणून उदयास आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 च्या अखेरीस केंद्र सरकारच्या सर्व 10 लाख रिक्त पदे भरण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. पहिला ‘रोजगार मेळा’ ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात आला होता, जिथे पंतप्रधानांनी तरुण इच्छुकांना अशा 75,000 नोकऱ्यांचा पदभार सोपवला. मात्र यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की 10 लाख नोकऱ्या देण्याचं टार्गेट कसं पूर्ण करणार आहेत? याबद्दलचा मास्टर प्लॅन केंद्र सरकारनं रेडी केला आहे.
पुढील वर्षाच्या अखेरीस 10 लाख नोकऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्राने तयार केलेल्या पाच कलमी योजनेबद्दल News18 च्या हाती माहिती लागली आहे. एका उच्च अधिकार्याने सांगितले की, ही कल्पना “भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ फ्रेम अधिक संकुचित करणे” आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पाच पॉईंट्सनुसार काम चालणार आहे.
SD Social Media
9850 60 3590