बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर याने आपली आई अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या नावाचा टॅटू छातीवर गोंदवून घेतला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्याला त्याच्या आईची आठवण आली आहे. प्रतीकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. प्रतीकचे चाहते त्याचे आईबद्दलचे हे प्रेम पाहून खूप आनंदित झाले आहेत. लोक त्याची खूप स्तुती करत आहेत
प्रतीक बब्बर याने शेअर केलेल्या फोटो तो आपल्या कुत्र्यासोबत जमिनीवर पडलेला दिसत आहे. फोटोमध्ये स्मिता पाटील असे नाव त्याच्या छातीवर लिहिलेली दिसत आहे. स्मिता पाटील यांची जन्म तारीख 1955 देखील या नावाखाली लिहिलेली आहे.
माझी आई माझ्या मनात कायम जिवंत राहील !
हा फोटो शेअर करत प्रतीकने लिहिले की, ‘माझ्या आईचे नाव माझ्या हृदयावर लिहिले आहे… ती नेहमी माझ्या हृदयात जिवंत राहील.’ यासोबतच ‘1955 – इन्फिनिटी’ देखील लिहिले आहे. प्रतीकचे आईबद्दलचे हे प्रेम आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
प्रतीक याने आपल्या टॅटूमध्ये स्मिता पाटील यांच्या जन्मवर्ष लिहिले आहे, तर मृत्यू वर्षाऐवजी ‘इन्फिनिटी’ची खुण केली आहे. या टॅटूमध्ये स्मिता पाटील यांच्या मृत्यूचे वर्ष त्याने लिहिलेले नाही. स्मिता पाटील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी परिचित आहेत. हिंदी चित्रपटविश्वात त्यांनी अल्पावधीसाठीच काम केले, परंतु आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर ती एक स्टार म्हणून उदयास आली. स्मिता पाटील यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1975 मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटाने केली होती.