आज जागतिक नृत्य दिवस

दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो

बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (१७२७-१८१०) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था (आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था) ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. १९८२ सालापासून जागतिक नृत्य दिवस दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते.
नृत्य.. डान्स.. आज प्रत्येक भारतीयाच्या नाही तर जगातल्या प्रत्येकाशी मनाचं वैश्विक नातं जोडणारा हा कलाप्रकार.. होय एकीकडे तेल, सिमावाद, धर्म अशा नानाविध प्रकारांनं जगात फक्त विरोधाच्या भिंती उभ्या राहत असताना, जगभरातल्या डान्स प्रकारांनी मात्र देश-परदेशातही प्रत्येक सजग मनात आपली मुळं घट्ट रोवलीय.. जगभरातल्या नृत्य प्रकारांबद्दल किती आणि बोलावं.. शब्द थिटं पडतील अस पदलालीत्य.. भुरळ या शब्दालाही क्षणक्षर मोह पडावा असा नृत्यआविष्कार आणि श्रवणीयपणाही मंत्रमुग्ध व्हावा असं मनमोहक संगीत..जागतिक नृ्त्याविष्काराचा आढावा घेतला की शब्दांच्या मर्यादा आणि कलेचा बेफामपणा ठायी ठायी दिसतो.. तासातासाला काय तर क्षणाक्षणाला संगित जगणा-या आणि नृत्यावर थिरकणा-या या कलावंतासाठी खर तर प्रत्येक क्षण हा नृत्यासाठी समर्पित असतो.. पण या तमाम नृत्यकलावंतासाठी २९ एप्रिल हा दिवस विशेष असतो.. कारण अवघं जग २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिवस म्हणून मोठ्या अभिमानानं साजरा करतो. युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था याचं आयोजन करतं.. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक संघटना १९८२ पासून दरवर्षी २९ एप्रिलला आतंरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा करतंय. या दिवशी संबधित वर्षातील नर्तकाला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. सर्वोत्कृष्ट नर्तकाची निवड आयटीआयची आतंरराष्ट्रीय नृत्य समिती करते. त्या वर्षीचा लक्षवेधी नृत्यप्रकार आणि त्याच्यासाठी सन्मानित झालेला नृत्यकलावंत यांचा हा वैश्विक गौरव असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक असलेला ही नृत्यकला राष्ट्राच्या सीमा ओलांडून प्रत्येक प्रांतात आपली घट्ट वेसण बाधंत चाललीय हे मात्र नक्की.

संजीव वेलणकर, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.