टीम इंडिया जिंकली, पण सेमी फायनलचं तिकीट मिळालं का?
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं आणखी एका दणदणीत विजयाची नोंद केली. टीम इंडियानं अॕडलेडच्या मैदानात बांगलादेशचा डकवर्थ लुईस नियमानुसार पराभव केला. भारतीय संघाचा यंदाच्या वर्ल्ड कपच्या मैदानातला हा तिसरा विजय ठरला. त्यामुळे टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये 6 पॉईंटसह पहिल्या नंबरवर पोहोचली आहे. तर दुसऱ्या नंबरवर दक्षिण आफ्रिका आहे. सुपर 12 फेरीच्या ग्रुप 2 मध्ये सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे सामने बाकी आहेत. तर टीम इंडिया पुढचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा सेमी फायनलमधला प्रवेश निश्चित मानला जात आहे.
दरम्यान या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यावेळी लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशनं बिनबाद 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर बांगलादेशला 16 ओव्हरमध्ये 151 असं सुधारित टार्गेट मिळालं. पण पावसानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जादू केली. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमीनं प्रभावी मारा करताना बांगलादेशी संघाला रोखून धरलं. त्यामुळे टीम इंडियाला बांगलादेशवर अखेरच्या क्षणी विजय साजरा करता आला.
60 लाखांचे दागिने अन् 13 लाख रोख घेऊन चोरटा निघाला होता सौदी अरेबियाला, पण पोलिसांनी दाखवली कोठडी
नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी शांती नगर पोलीस स्टेशन हद्दीत 73 लाख रुपयांची चोरी झाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. व्यसनाधीन असलेल्या एका 28 वर्षीय तरुणानेच ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर जावेद थारा असं अटकेतील तरुणाचं नाव आहे. तर वाजीद वल्द गफ्फुर अली असे सहकऱ्याचे नाव आहे. या दोघांना एकूण 13 लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिसांनी अखेर चौकशी अंती या दोघांकडून हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेत मुलासह आणखी एका सहकऱ्याला अटक केली आहे. इलेक्ट्रॉनिक लोकर तोडणारा एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विदेशी पर्यटकांचा दिवाळी धमाका, जागतिक आश्चर्य पाहण्यासाठी मोठी गर्दी
औरंगाबाद जिल्ह्याची राज्याची पर्यटन म्हणून ओळख आहे.औरंगाबाद जिल्ह्यात एकापेक्षा एक पर्यटनस्थळे आहेत. ज्यामध्ये अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बिबी -का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. जिल्ह्यात जागतिक स्तरावरची पर्यटनस्थळे आहेत. यामुळे जगभरातील विदेशी पर्यटकांची मोठी रेलचेल जिल्ह्यात नेहमी बघायला मिळते. मात्र, कोरोना संसर्गजन्य आजरामुळे गेल्या दोन वर्षांत या ठिकाणचे विदेशी पर्यटकांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र,गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले विदेशी पर्यटक आता पुन्हा परतू लागले आहेत.
दिवाळी दरम्यानच्या काळात 24 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर पर्यंत 499 विदेशी पर्यटकांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट दिल्याची माहिती औरंगाबाद पुरातत्व विभागाने दिली आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळे बंद होती. त्यासोबतच विदेशी पर्यटक कोरोना संसर्गजन्य आजारामुळे येऊ शकत नव्हते. याचा परिणाम पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला होता पर्यटन इंडस्ट्री अडचणीत आली होती. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना विदेशी पर्यटक नेहमी दिसायचे मात्र दरम्यानच्या काळात पर्यटक गायब झाले होते.
…तर तांडव करू, लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा इशारा, कोल्हापूरचं वातावरण तापलं!
कोल्हापुरात लव जिहादच्या विषयावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील शाळकरी मुलगी जर परत आली नाही तर तांडव करू, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला. तसंच धर्मांतर बंदीचा कायदाही येत्या अधिवेशनात आणणार असल्याची माहिती नितेश राणेंनी दिली.कोल्हापुरात शाळकरी मुलीच्या बेपत्ता प्रकरणाला लव्ह जिहादचं वळण लागलं आहे. या प्रकरणावरून कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनीही सहभागी होत पोलिसांना खडे बोल सुनावले. राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पोलिसांच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. तसंच मुलीचा शोध घेऊन परत न आणल्यास तांडव करू असाही इशारा दिला.
शरद पवारांना आज मिळणार डिस्चार्ज, मागील 3 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती सोमवारी 31 ऑक्टोबरला समोर आली होती. यानंतर पुढील तीन दिवस शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले. यानंतर आज 2 नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे या हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत.
“…म्हणून मला हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणता येणार नाही”; ठाकरे, शिंदेंचा उल्लेख करत उज्ज्वल निकमांचं विधान
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटामधील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोरील सुनावणी चार आठवड्यांनी लांबणीवर पडली आहे. शिवसेनेतील फूट आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील घटनात्मक मुद्द्यांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून, त्यानंतर नियमित सुनावणींमध्ये हे प्रकरण निकाली निघू शकेल असं सांगितलं जात आहे. मात्र या नव्या तारखेच्या घोषणेनंतर सध्या राज्यात सत्तेत असणारं शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे का यावरुन आरोप प्रत्यारोप आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून अनेकदा विद्यमान सरकार हे घटनाबाह्य असल्याचं म्हटलं जात आहे. असं असतानाच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.
एका चर्चासत्रादरम्यान सतत या सरकारला घटनाबाह्य सरकार म्हटलं जात आहे. काय वाटतं तुम्हाला आताच्या परिस्थितीमध्ये सरकारला घटनाबाह्य म्हणणं योग्य ठरेल का? की घटनापीठाचा निकाल आल्यानंतरच याबद्दल विचार केला जाऊ शकतो? त्या निर्णयाआधी याबद्दल काही भाष्य करणं चुकीचं ठरेल का? असे प्रश्न उज्ज्वल निकम यांना ‘मुंबई तक’वरील चर्चासत्रात विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना निकम यांनी घडलेला घटनाक्रम हा फारच नियोजनपूर्व पद्धतीने करण्यात आल्याचं निकम यांनी म्हटलं आहे. इतकेचं नाही घडलेल्या घटनाक्रमातील तारखांसहीत निकम यांनी विश्लेषण केलं आहे.“सगळा घटनाक्रम क्रोनोलॉजिकली पाहिला तर कायदाचा विद्यार्थी म्हणून मला हे घटनाबाह्य सरकार आहे असं म्हणता येणार नाही. राजकीय आरोप म्हणाल तर शिंदे गटाचीही बाजू घ्यायची नाही आणि ठाकरे गटाचीही बाजू घ्यायची नाही,” असं निकम यांनी स्पष्ट केलं आहे.
अशोक गेहलोतही गुलाम नबी आझादांच्या मार्गावर? सचिन पायलट यांचं सूचक विधान
राजस्थानमध्ये सचिन पायलट गट विरुद्ध अशोक गेहलोत गट असा काँग्रेसमधील अंतर्गत वाद अद्यापव शमण्याचं नाव घेत नाहीये. २०२०मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या सत्ताबदलापासून सचिन पायलट भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत सत्तासंघर्ष वाढतच गेल्याचं दिसून आलं आहे. नुकतंच सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांचं नाराजीनाट्यही राजस्थानसोबतच देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं होतं. आता राजस्थानमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशोक गेहलोत यांनी एकमेकांचं कौतुक केल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सचिन पायलट यांनी त्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचं समन्स, अवैध खाणकाम प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे आदेश
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. “मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही तथ्ये समोर आली असून, त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे”, असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पंकज मिश्रा बरहैट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अवैध खाणकाम प्रकरणात तपास यंत्रणेनं देशभरात शोधमोहीम हाती घेतली आहे. मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल १ हजार कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली आहे.
‘महाविकासआघाडी’मध्ये पुन्हा धुसफूस, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची बैठकीला दांडी!
महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाल्याचं बोललं जात आहे, यावेळी विधानपरिषद निवडणुका या धुसफुशीचं कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातून नागपूर आणि अमरावती या दोन मतदारसंघाची विधानपरिषदेसाठी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा मागत आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे काल महाविकासआघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला काँग्रेस नेते आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी झाल्याचं चित्र आहे.
SD Social Media
9850 60 3590