मेलबर्नमध्ये टीम इंडियाची दिवाळी साजरी, थरारक सामन्यात विराट ठरला टीम इंडियाच्या विजयाचा नायक
विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली.
विमा पॉलिसी घ्यायचीये? 1 नोव्हेंबरपासून नियमांत होणार बदल
अलीकडच्या काळात आर्थिक गोष्टींच्या नियमांत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यातही बँका किंवा इतर शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी केवायसी सक्तीची करण्यात आली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून आरोग्य आणि मोटर विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना त्यांची केवायसी कागदपत्रे द्यावी लागतील. IRDAI ही तारिख यापुढे पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाही. कारण भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) सामान्य विमा कंपन्यांसाठी KYC तपशील अनिवार्य करणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्यानं हा दावा करण्यात आला आहे.
‘…तेव्हा मी आणि मोदी घरातच होतो,’ भाजप-शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार
परतीच्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसल्याची टीका वारंवार भाजप आणि शिंदेंच्या आमदार-खासदारांकडून केली जाते, यावरही उद्धव ठाकरेंनी पलटवार केला.
‘आम्ही त्यावेळी वाढवून मदत केली होती, त्यावेळी नीती आयोगासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक झाली होती. मी माझ्या घरी आणि पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी बसून होते. आम्ही घरी बसूनच काम केलं होतं. जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. मी आणि पंतप्रधानांनी घरात बसूनच तेव्हा काम केलं होकतं. एनडीआरएफच्या निकशापेक्षा जास्त मदत दिली होती. हे निकष बदलले पाहिजेत,’ असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला.
‘पाऊस सरकारच्या हातात नाही, असंही म्हणतील’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला
‘काही दिवसांपूर्वी पुण्यात प्रचंड पाऊस झाला. पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. आजही ते म्हणतील, संपूर्ण चिखल झाला आहे, पाणी झालं. आता ते असंही म्हणतील, ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा, हे सरकारच्या हातात नसतं, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
खुशखबर! मान्सूनचा परतीचा प्रवास संपला, हवामान खात्याची घोषणा
जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस परतणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मागच्या चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने धुमाकूळ घातले होते. दरम्यान परतीच्या पावसानेही राज्यातील विविध भागात पाऊस सुरू होता. मान्सूनचा परतीचा प्रवास थांबणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. दरम्यान राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
संपूर्ण राज्यातून ओलावा कमी होणे म्हणजेच आपल्या राज्यातून 2022 च्या मान्सूनच्या समाप्तीचे प्रतीक देण्यात आले आहेत. अशी घोषणा रविवारी हवामान विभागाने केली त्यामुळे मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यात (दि.28) ऑक्टोबर पर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
इस्त्रोची देशाला दिवाळी भेट, ग्लोबल मार्केटमध्ये रचला इतिहास!
भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने देशाला दिवाळीची खास भेट दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केलं. इस्रोचं रॉकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारतानं ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे.इस्त्रोने आज नव्याने दमदार कामगिरी केली आहे. इस्रोच्या रॉकेट LVM-3 चं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं. या प्रक्षेपणासह, इस्रोनं सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. 36 उपग्रह प्रक्षेपणांच्या या मिशनसाठी, इस्रोनं आपलं सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केलं.
भाजपा मंत्र्यानं तक्रार करायला आलेल्या महिलेच्या कानशिलात लगावली
एका सरकारी कार्यक्रमात तक्रार करणाऱ्या एका सामान्य महिलेला भाजपाच्या मंत्र्यानं रागाच्या भरात कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे.हा सगळा प्रकार शनिवारी कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील हांगला गावात घडला. कर्नाटकचे पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा हे एका शासकीय कार्यक्रमासाठी या गावात उपस्थित होते. सरकारकडून ग्रामस्थांना जमीन हक्कपत्र प्रदान करण्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हक्कपत्र वाटप सुरू असताना अचानक एक महिला आपल्याला हक्कपत्र न मिळाल्याची तक्रार घेऊन समोर आली. या महिलेच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या मंत्रीमहोदयांनी थेट तिच्या कानशिलातच लगावली.
मोदी सरकारकडून राजीव गांधी फाउंडेशनचा FCRA परवाना रद्द
मोदी सरकारकडून गांधी कुटुंबियांशी संबंधित असलेल्या राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा एफसीआरए (FCRA) परवाना रद्द करण्यात आला असून एफसीआरए (FCRA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राजीव गांधी फाउंडेशनने चीनच्या दुतावासाकडून निधी स्वीकारणाऱ्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक समिती २०२० मध्ये स्थापन करण्यात आली होती.
इम्रान खान यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज ) पक्षाचे खासदार मोहसीन शाहनवजा रांझा यांनी पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच इस्लामाबादच्या सेक्रेटेरियट पोलीस ठाण्यात इम्रान खान यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. इस्लामाबादमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पाकिस्तान-तहरीक-ए इंसाफच्या कार्यकर्त्यांनी इम्रान खान यांच्या सांगण्यावरूनच त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप रांझा यांनी केला आहे.
‘टाईमपास ३’ आता छोट्या पडद्यावर, दगडू-पालवीची लव्हस्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाईमपास’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील संवादांमुळे हा चित्रपट गाजला होता. आजही प्रेक्षकांना यातील संवाद लक्षात आहेत. टाईमपासच्या यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांसाठी घेऊन आले आणि नुकताच या चित्रपटाचा तिसरा भागदेखील प्रदर्शित झाला होता. तिसऱ्या भागात ऋता दुर्गुळे दिसली होती. ‘महाराष्ट्राची क्रश’ अशी ओळख असलेल्या ऋताने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ‘टाईमपास ३’ चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत आपल्या समोर आली आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगली कमाई केली होती. आता चित्रपट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
SD Social Media
9850 60 3590