ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना 4 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवस आयसीयूमध्ये राहिल्यानंतर त्यांची प्रकृती आता ठीक आहे. स्वतः धर्मेंद्र यांनी ट्विट करून त्यांची तब्येत बरी झाल्याची माहिती दिली आहे.
शरीराबाबत निष्काळजीपणा केल्याचं परिणाम भोगावे लागत असल्याचे ट्विट धर्मेंद्र यांनी केलं आहे. परिणामी त्यांना स्नायूंच्या दुखण्यासारखे त्रास सहन करावे लागले. वेदना एवढ्या होत्या की त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.
धर्मेंद्र पुढे म्हणाले की, ‘तुमच्या लोकांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने मी आता बरा आहे. तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो”, असं धर्मेंद यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाबाबत बोलायचं झालं तर, ते जया बच्चनसोबत करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमासाठी काम करत आहे. यात धर्मेंद्र आणि जया यांच्यासह रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत.