महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा विषय अनेकांनी मांडला आहे, मी फक्त पर्याय दिला आहे. मशीदीवर लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा पठण करु , मोठ्याने लावू, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात दंगली घडवायची इच्छा नाही. मुस्लीम समाजानेही ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय आहे, धार्मिक विषय नाही. लाऊड स्पीकर या विषयाला तुम्ही धार्मिक विषय देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल हे लक्षात ठेवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, महाराष्ट्रातली शांतता आम्हाला बिघडवायची नाही, इच्छाही नाही आणि गरजही नाही असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
उत्तर प्रदेशमध्ये जर लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत, सर्व लाऊडस्पीकर हे अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला विचारल्याशिवाय तुम्ही लाऊडस्पीकर लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानगी आहे. कोणाकडेच परवानगी नाही.
संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत, काय बांगेची कॉन्सर्ट चालते काय इकडे, फक्त संभाजीनगरमध्येच नाही तर संपूर्ण देशात आहेत. सर्व देशातील लाऊडस्पीकर खाली आले पाहिजे, सर्वाना समान धर्म असला पाहिजे, प्रत्येकवेळा आम्हीच का भोगायचं. आम्हाला सभा घ्यायची असेल की सांगतात हा सायलेन्ट झोन आहे, इथे शाळा आहे, रात्रीची कुठची शाळा आहे.
यांना कुठेही परवानीग मिळते. रस्तावर येऊन तुम्ही नमाज पडतायत, कोणी अधिकार दिले तुम्हाला, माझी शासनाला विनंती आहे, तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. पण चार तारखेपासून ऐकणार नाही असा इशाार राज ठाकरे यांनी शासनाला दिला.
महाराष्ट्रातील सर्व हिंदु बांधव आणि भगिनींना हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लागलीच पाहिजे असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.
विनंती करुन जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नसेल. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही.
दरम्यान राज ठाकर यांचं भाषण सुरु असताना अजान सुरु झालं यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना विनंती केली. माझ्या सभेच्या वेळेला जर बांग सुरु करत असतील तर आपण आताच्या आता तोंडात बोळा कोंबावा, यांना सरळ मार्गाने जर समजत नसेल, तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहित नाही. आताच्या आता जाऊन ते बंद करा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
त्यांना समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ दे, अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा एकदा विनंती करतोय, ये जर या पद्धतीने वागत असतील तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद हे एकदा यांना दाखवावच लागेल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.