भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर साठी १६ मार्च हि तारीख खूप महत्वाची आहे . कारण आजच्या दिवशीच सचिन ने शतकाचे शतक करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध रंगलेल्या सामन्यात सचिनने 114 धावांची दमदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा हा विक्रम आजही अबाधित आहे. क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची ख्याती आहे.
12 मार्च 2011रोजी विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले 99वे शतक केले होते. नन्तर चे शतक पूर्ण करण्यासाठी सचिनला तब्बल र एक वर्ष चार दिवस वाट पहावी लागली होती. दरम्यान भारताने इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. सचिनने 34 डाव खेळले. शेवटी, बांगलादेशच्या मुशरफी मुर्तझाच्या चेंडूवर फटका खेळत सचिन ने हा विक्रम केला.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,347 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 18,426 धावा तर कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. सचिनने कसोटीत 51 शतके आणि वनडेमध्ये 49 शतके ठोकली आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 11 आणि कसोटी सामन्यात 8 शतके ठोकली आहे