मोटोरोलाचे दोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन लाँच

मोबाईल च्या जगात रोज नवे नवे तंत्रज्ञान येत असते. नवे फिचर घेऊन मोबाईल कंपन्या बाजारात आपले फोन आणत आहेत. मोटोरोला (Motorola ) कंपनीने भारतात Moto G30 आणि Moto G10 Power हे दोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन लाँच केलेत. या दोन्ही फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असून स्टॉक अँड्रॉईड 11 चा सपोर्ट आहे.
सुरक्षेसाठी यामध्ये ThinkShield या खास टेक्नॉलॉजीचा वापरही करण्यात आला आहे. यातील Moto G10 Power या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन आज पहिल्यांदाच सेलमध्ये खरेदीसाठीही उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरही 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे.

काय आहे स्पेसिफिकेशन्स
Moto G10 Power मध्ये स्टॉक अँड्रॉइड 11 चा सपोर्ट असून 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. मेमरी कार्डद्वारे यातील स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. शिवाय या फोनमध्येही क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील चारही कॅमेरे अनुक्रमे 48 मेगापिक्सेल मेन लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. शिवाय सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल. तर, कनेक्टिव्हिटीसाठी Moto G10 Power या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, USB टाईप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. शिवाय फोनच्या मागील बाजूला रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही दिलं आहे. Moto G10 Power मध्येही कंपनीने 20W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.