पहिल्या महिला प्रीमियर लीगला ४ मार्चपासून सुरुवात झाली. यात उद्घाटनाच्या सामन्यात गुजरात जायंट्सला मुंबईकडून पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर आणखी एक मोठा धक्का त्यांना बसला. वेस्ट इंडिजची अष्टपैलू क्रिकेटर डिएंड्रा डॉटिन स्पर्धेच्या एक दिवस आधीच WPLमधून बाहेर पडली आहे. सुरुवातीला संघाकडून याबाबत काही स्पष्ट करण्यात आले नव्हते. मात्र डिएंड्राबाबत वाद वाढल्याने अखेर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
गुजरात जायंटसने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. डिएंड्रा ही एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. तिला आमच्या संघात घेतल्यानं आम्ही आनंदी आहे. पण दुर्दैवाने हंगामाच्या एक दिवस आधी तिचा मेडिकल क्लिअरन्स मिळू शकला नाही. WPLमध्ये क्लिअरसन्ची एक प्रोसेस असून सर्व खेळाडूंसाठी ती आवश्यक आहे.
दरम्यान, डीएंड्राने लीगमधून बाहेर पडल्याचे अपडेट देताना म्हटलं की, मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. डिएंड्राने तिच्या फिटनेसबाबत होत असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. माझ्या चाहत्यांकडून जे मेसेज येत आहेत त्यासाठी धन्यवाद पण खरंतर मी त्यातून सावरत आहे.डीएंड्राच्या वक्तव्यावरून असंही म्हटलं जात आहे की, हे फक्त दुखापत किंवा मेडिकल क्लिअरन्सचे प्रकऱण नाही. तर दुसऱ्या बाजूला गुजरातच्या संघाने डिएंड्राच्या जागी किम गर्थला संघात घेतलं. किम गार्थने युपी वॉरिअर्सविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट घेतल्या. मात्र ग्रेस हॅरीसच्या खेळीमुळे तिची कामगिरी झाकोळली गेली.