दिवाळीला नाही वाढणार डाळींची किंमत! सरकार बाजारभावापेक्षा 8 रुपयांनी स्वस्त दराने करतंय विक्री

दिवाळीत खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, केंद्र सरकारने डाळींच्या किमती नियंत्रित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. बाजारभावापेक्षा 8 रुपये किलोने स्वस्त असलेली डाळ राज्यांना दिली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. सध्या सरकारकडे 43 लाख टन डाळींचा साठा आहे.

सरकारने डाळींच्या एमएसपीमध्ये केली वाढ –

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना 88000 टन डाळींचा पुरवठा केला आहे. दिवाळीला भाव वाढणार नाहीत, असा विश्वास सरकारने पूर्ण तयारी केली आहे. डाळींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे.मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता मसूरचा एमएसपी 5500 रुपये प्रति क्विंटलवरून 6000 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.

भारत डाळी करतो आयात –

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2022-26 या कालावधीत प्रत्येक आर्थिक वर्षात म्यानमारमधून 2,50,000 मेट्रिक टन उडीद आणि 1,00,000 मेट्रिक टन तूर आयात केली जाईल. भारत पुढील पाच आर्थिक वर्षांत मलावीतून 50,000 मेट्रिक टन तूर आयात करेल. सरकारने 2022-26 या कालावधीत खाजगी व्यापाराद्वारे मोझांबिकमधून दरवर्षी 2,00,000 मेट्रिक टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.