‘अभियांत्रिकी प्रवेश 2022 नियम व प्रक्रिया ‘ वर बुधवारी जळगावातील व.वा.वाचनालयात मोफत मार्गदर्शन व चर्चासत्र

नाशिकच्या के.के.वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन महाविद्यालयातर्फे आयोजन

जळगाव – नाशिक येथील के.के. वाघ शिक्षण संस्था गेल्या ५० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देत आहे.के. के.वाघ शिक्षण संस्था संचलित के.के.वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालय नाशिक , हे AICTE, NBA , NAAC मान्यताप्रप्त असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नीत नाशिकमधील एकमेव स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२ साठी अभियांत्रिकी प्रवेश संदर्भातील नियम व प्रक्रिया मार्गदर्शन व चर्चासत्र बुधवार दि.१२ आॕक्टोबर २०२२ रोजी दुपारी.४.३० वाजता व.वा.वाचनालय ,स्टेशन रोड ,जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
सर्व इच्छुक विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून समुपदेशन चर्चासत्राचा मोफत लाभ घ्यावा , असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डाॕ.प्रदीप डी.जाधव ( ९८२२ ६७ ०९७६ ) , डाॕ.रविंद्र मुंजे ( ९९२३ १८ १७११ ) आणि डाॕ.विलास पाटील यांच्याशी संपर्क साधावा , असे डाॕ.के.एन. नांदुरकर , प्राचार्य , के. के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय , नाशिक यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.